किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील सेवानिवृत्त रेणूराव संभाजी मुनेश्वर यांच्या संपर्कातील दोन संशयितांनी तुमच्या मुलीला नाेकरीला लावतो असे सांगून २०१६ मध्ये १० लाखांची मागणी केली होती. यातील ८ लाख ५० हजार ुरुपये त्यांनी मुनेश्वर यांच्याकडून उकळलेही. मात्र पैसे घेऊनही नोकरीबाबत कोणतीही प्रक्रिया होत नसल्याचे पाहून मुनेश्वर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र आरोपींनी तुम्हाला काय करायचे ते करा, पैसे परत मिळणार नसल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर आम्ही आ. रवी राणा यांची माणसे आहोत, पोलिसांत तक्रार दिली तर तुम्ही जीवंत राहणार नाही अशी धमकीही दिली. अखेर या प्रकरणात रेणूराव मुनेश्वर यांच्या तक्रारीवरून किनवट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
मुलीला नोकरीला लावतो म्हणून ८ लाख ५० हजार उकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:20 AM