जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९१ हजार ११२ एवढी झाली असून, यातील ८७ हजार ३७८ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ७८ रुग्ण उपचार घेत असून, यात तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरूक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेऊन मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करून अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ६५६ कोरोनाचे बळी गेले आहेत.
रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा हद्दीत ५, लोहा १, आंध्र प्रदेश १, तर अँटिजन तपासणीद्वारे देगलूर १, असे एकूण ८ बाधित आढळले.
जिल्ह्यातील १० कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ४, मनपांतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील ५, खासगी रुग्णालय एका व्यक्तीला सुट्टी देण्यात आली.
जिल्ह्यात ७८ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ६, देगलूर कोविड रुग्णालय १, हदगाव कोविड रुग्णालय १, मुखेड कोविड रुग्णालय ३, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ५७, जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण ४ व खासगी रुग्णालयात १ व्यक्ती उपचार घेत आहे.