लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस सुरु आहे़ रविवारी जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात अतिवृष्टी झाली होती़ तर उमरीत ढगफुटीसदृश्य परिस्थिती होती़ त्यानंतर सोमवारी तब्बल १२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून त्यात ६० मंडळांचा समावेश आहे़ दरम्यान, १९ व २० आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ हजार १०९ घरांची पडझड झाली असून ९ हजार ५२८ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने वर्तविला आहे़जिल्ह्यात जुलैमध्ये दोन दिवस मनसोक्त बरसलेल्या पावसाने त्यानंतर तब्बल २५ दिवसांचा खंड दिला. गुरुवारपासून पावसाने पुनरागमन केले होते़ त्यानंतर शुक्रवारी पावसाने उघडीप दिली होती़ रविवारी सायंकाळी सुरु झालेला पाऊस मात्र २४ तासांहून अधिक काळ मनसोक्त बरसत होता़ सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३७़७० मि़मी़पावसाची नोंद झाली होती़ त्यात मुदखेड आणि उमरी भागात पावसाने थैमान घातले होते़ त्यानंतर सोमवारी दिवसभर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच होती़ मध्येच पावसाचा जोर वाढत होता़ सोमवारी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच होती़ त्यामुळे विष्णूपुरी, बळेगाव, आमदुरा या प्रकल्पांचे दरवाजे उघडावे लागले होते़ दुसरीकडे गोदावरी, आसना आणि कयाधू नदीचे पात्रही दुथडी वाहत आहे़बाभळी बंधाराही भरला आहे़ पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आतापर्यंत सहाजण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत़ त्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे़ सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली़ त्यात नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, कंधार, लोहा, हदगांव, हिमायतनगर, बिलोली, धर्माबाद, नायगाव आणि मुखेडचा समावेश आहे़ त्याचबरोबर ६० मंडळांमध्येही ६५ मि़मी़ पेक्षा अधिक पाऊस झाला़ त्यामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले असून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे़ जिल्ह्यात १९ आणि २० आॅगस्ट रोजी ज्या मंडळामध्ये ६५ मि़मी़ पेक्षा अधिक पाऊस झाला आहे़दोन दिवस जोरदार बॅटींग केलेल्या पावसाने मंगळवारी मात्र विश्रांती घेतली़ सकाळी नांदेडकरांना सूर्यदर्शन झाले़ त्यानंतर मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते़ परंतु, पावसाने हजेरी लावली नव्हती़ त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता़ परंतु, दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत हाहाकार उडाला असून शेतजमिनी खरडून गेल्या आहेत़ सोयाबीन, कापूस यासह पिके आडवी झाली आहेत़ त्याचबरोबर घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्यही भिजले आहे़---माहूर, किनवटचा नजरअंदाज१६ आॅगस्ट रोजी सरासरी ७१़८६ मि़मी़पाऊस झाला होता़ किनवट व माहूर तालुक्याचा नजरअंदाज काढण्यात आला असून जिरायत क्षेत्र ७१ हजार ३१ हेक्टर, बागायत १५७ हेक्टर, फळपिके १६१ हेक्टर असून यामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुसान झालेले जिरायत क्षेत्र ६४ हजार ७८० एवढे आहे़ तर बागायत १२५ हेक्टर व १४२ हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाले आहे़---
‘कयाधु’ला पूर ; पाच गावांचा संपर्क तुटला
- हदगाव : हदगाव तालुक्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीला पूर आल्यामुळे पाच गावांचा संपर्क तुटला़ तर काल वाहून गेलेल्या शेतकºयाचा मंगळवारी सायंकाळपर्यंत शोध लागला नव्हता़
- उंचाडा, तालंग, नेवरी, नेवरवाडी व मार्लेगाव या पाच गावांचा संपर्क तुटला़ या गावातील जनजीवन विस्कळीत झाले़ उंचाडा, मार्लेगाव पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्लेगाव, बाळापूर, शेवाळा हा मार्ग बंद झाला़ या गावातील नागरिकांना बाहेरगावी जाता येत नाही़ बाहेर गेलेले गावी परतू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे़ गावातील विद्यार्थी हदगाव, बाळापूर, पिंपरखेड येथे शिकायला आहेत़ त्यांना अघोषित सुटी मिळाली़ तर जिल्हा परिषद शाळेत येणारे शिक्षक पाण्यामुळे येवू शकले नाहीत़ गेल्या दोन दिवसांतील पाण्याचा जोर चांगलाच वाढला़ त्यामुळे नदी, ओढे तुडुंब भरून धिंगाणा घातला़ १५ हजार १३० हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले़ यामुळे या क्षेत्रातील पिकांना मोठा फटका बसला आहे़ जमिनी खरडून गेल्या़ हे पाणी ओसरायला अजून आठवडा, पंधरवडा लागतो़ तोपर्यंत पिके जळून जातात़
एकीकडे मोठा पाऊस झाला म्हणून शेतकरी आनंदी आहे़ परंतु, शेतातील पिके उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या डोळ्यातही अश्रूधारा वाहत आहेत़ नदी-नाल्याकाठावरील जमिनी खरडून गेल्या़ मोठमोठी भगदाडे पडली तर या गावातील शेती जलमय झाली आहे़ १ जून ते ३१ आॅक्टोबरपर्यंत पडणारा पाऊस सरासरी पर्जन्यमान ९७७़३३ मि़मी़ आहे़ यावर्षी अडीच महिन्यांमध्ये ८०० मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़ पिंपरखेड-मार्लेगाव रस्त्यावर पूल बांधला तेव्हापासून एकदाही पूर गेला नव्हता़ परंतु, या दोन दिवसांत पाणी पुलावरून वाहिले आहे़ त्यामुळे या शिवारातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले़पाऊस सुरू असल्यामुळे निश्चित नुकसान किती झाले याचा अंदाज लागत नसला तरी येणाºया आठवड्यात हे क्षेत्र वाढणारच असल्याचा अंदाज उपविभागीय दंडाधिकारी महेश वडदकर यांनी व्यक्त केला आहे.---‘मन्याड’चे बँक वॉटर जुन्या आलुरात शिरलेदेगलूर : तालुक्यात सोमवारी सरासरी ४९.१६ मि. मी पाऊस पडला. सोमवारी रात्री सर्व गावांचा संपर्क तुटला होता तर मन्याड नदीचे बॅक वॉटर जुन्या आलूर गावात शिरले होते.मन्याड नदीचे पाणी तुपशेळगाव व आलूर गावातील नदीकाठी असणाºया काही जमिनीत शिरल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. मन्याड नदी सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारपर्यंत दुधडी वाहत होती. सोमवारी रात्री मन्याड नदीचे बॅक वॉटर करेमलकापूर नाल्याद्वारे ५६ घरे असणाºया जुन्या आलूर गावात पाणी शिरले. त्यामुळे रात्री गाढ झोपेत असलेल्या नागरिकांची मोठी धावपळ उडाली़ अनेकांच्या घरातील साहित्य पाण्यामुळे भिजले़ सोमवारी सकाळपासूनच नाल्याचे पाणी ओसरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.सोमवारी रात्रीच मुख्य रोडलगत असलेल्या नाल्याला पाणी आल्याने रात्री गावाचा संपर्क तुटला होता. दरम्यान, मन्याड नदीचे पाणी तुपशेळगाव व आलूर या गावांतील नदीकाठी असणाºया काही शेतांत शिरुन पिकांचे नुकसान झाले असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळपासून दुपारी तीनपर्यंत पावसाने उघडीप दिल्याने पाणी ओसरत आहे.मंडळनिहाय पाऊस असा: शहापूर: ८७ मि. मी, खानापूर: ६६, देगलूर :५९ ,मरखेल : ३६, माळेगाव: ३३, हणेगाव: १४ असा एकूण पाऊस २९५ मि. मी. पडला तर सरासरी ४९.१६ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली. सोमवारी दिवसरात्र पडलेल्या पावसामुळे शिवनेरी, दत्तनगर, गणेशनगर, विद्यानगर, आंबेडकरनगर, हनुमाननगर, दत्तमंदिर परिसर, बापूनगर आदी भागांत पाणी शिरले. पाणी जाण्यासाठी नाल्या नसल्याने काही भागातील घरांना अद्यापही पाण्याचा वेढा असून, नगरपरिषदेचे कर्मचारी पाणी काढण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करीत आहेत.