शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मुखेड आगाराला ९० लाखांचा फटका; कर्मचाऱ्यांचे वेतन नांदेड विभागाकडून मागविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 6:49 PM

सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा येथील एसटी आगाराला मोठा फटका बसला आहे़

- दत्तात्रय कांबळे 

मुखेड : सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा येथील एसटी आगाराला मोठा फटका बसला आहे़ आंदोलन काळात तब्बल ९० लाखांचा फटका बसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन नांदेड विभागाकडून मागविण्यात आले आहे़.

मुखेड तालुक्यात २४ जुलै ते ९ आॅगस्टदरम्यान झालेल्या आंदोलनामुळे   आगाराच्या उत्पनावर मोठा परिणाम झाला आहे़ या काळात झालेल्या आंदोलनामुळे तब्बल ९० लाखांच्या जवळपास नुकसान झाले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लागणारे उत्पन्नही निघाले नाही़ त्यामुळे २० लाख रूपयांची मागणी नांदेड विभागाकडे करण्यात आली आहे़ 

मुखेड आगारात मागील वर्षी ६६ बसगाड्या होत्या. तर यंदा तर  ५७ गाड्या आहेत़  तालुक्यातील १५२ गावांच्या व बाहेरील तालुक्यातील प्रवाशांची  एसटीवरच मदार आहे.  दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनात आलूवडगाव येथे एक बस जाळली़ तर एक बस गंगनबीड-कुंटूर फाटा येथे काचा फोडून नुकसान केले. यात जळालेल्या गाडीचे ३० लाख व काच फोडलेल्या गाडीचे २० हजारांचे नुकसान झाले. २४ जुलै रोजी मुखेड आगाराकडून एसटी बंद ठेवण्यात आली होती. २८ जुलै रोजी दुपारी बंद, २९ जुलैला सकाळी बंद, ३१ जुलै रोजी मुखेड आगाराची गाडी जाळल्याने  दुपारनंतर बंद ठेवण्यात आले़ १ आॅगस्ट रोजी  सायंकाळी  ५ ते ७ च्या दरम्यान नांदेडसाठी ५ गाड्या सोडण्यात आल्या होत्या़ ९ आॅगस्टला तर चक्का जाम आंदोलनामुळे शंभर टक्के बंद पाळण्यात आला़ या सर्व घटनेमुुळे  मुखेड आगारास ९० लाखांचा फटका बसला आहे. 

२४ जुलै ते ९ आॅगस्टदरम्यान गाड्या बंद२४ जुलै रोजी मुखेड आगाराकडून एसटी बंद ठेवण्यात आली होती. २८ जुलै रोजी दुपारी बंद, २९ जुलैला सकाळी बंद, ३१ जुलै रोजी मुखेड आगाराची गाडी जाळल्याने  दुपार नंतर बंद ठेवण्यात आले़  १ आॅगस्ट रोजी  सायंकाळी  ५ ते ७ च्या दरम्यान नांदेडसाठी ५ गाड्या सोडल्या होत्या़ ९ आॅगस्टला तर चक्का जाम आंदोलनामुळे शंभर टक्के बंद पाळण्यात आला़ या सर्व घटनांमुुळे  मुखेड आगारास ९० लाखांच्या जवळपास फटका बसला आहे. आगाराचे उत्पन्न घटल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ 

आगारात ५७ गाड्या मुखेड आगारात सध्या ५७ गाड्या, १३९ चालक, १३९ वाहक, यांत्रिकी ५०, प्रशासकीय २३ अधिकारी असून आगारातून ५७ गाड्यांच्या १७५ जाणे व १७५ येणे अशा ३५० फेऱ्या एका दिवसात होतात़ तर २३ हजार ४८३ कि.मी. प्रवास होतो. यातून दर किलोमीटरला २९ ते ३१ रुपये उत्पन्न होते. यावरुन दररोज आगारास  अंदाजे ७ लाख ५० हजार उत्पन्न मिळते. मुखेड आगारात मागील वर्षी ६६ बस गाड्या होत्या.   तर यंदा तर  ५७ गाड्या आहेत़ तालुक्यातील १५२ गावांच्या व बाहेरील तालुक्यातील प्रवाशांची   एसटीवरच मदार आहे.   

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण