शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

मराठवाड्यातील शेतकरी कन्येचा सातासमुद्रापार डंका, बनली अमेरिकेत एअरफोर्स फ्लाइट कमांडर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 4:58 PM

कोंढा येथील केशवराव बालाजी जोगदंड यांचे पुत्र दिलीप हे २२ वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले.

- गोविंद टेकाळे अर्धापूर (जि. नांदेड) : तालुक्यातील कोंढा या गावातील रेवा दिलीप जोगदंड हिने यशाची उत्तुंग भरारी घेत अमेरिकेतील नेव्हल एअरफोर्स फ्लाइट कमांडर या पदाला गवसणी घातली आहे. एका शेतकरी कन्येने सातासमुद्रापार आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला असून, विद्यार्थ्यांसाठी तिचे यश आदर्श ठरत आहे.

कोंढा येथील रेवा जोगदंड हिने कर्तबगारीने अमेरिकेत एअरफोर्स फ्लाइट कमांडर या पदाला गवसणी घातली आहे. दोन वर्षांपासून तिने यासाठी अथक परिश्रम घेतले होते. या पदासाठी अमेरिकेत ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २६ जणांची निवड झाली. त्यातून एकमेव रेवा जोगदंडची फ्लाइट कमांडरपदी वर्णी लागली आहे. यामुळे हौसेसाठी काय पण करणारे कोंढा गाव पुन्हा चर्चेत आले आहे. 

वडिलांच्या संशोधनाची प्रेरणाकोंढा येथील केशवराव बालाजी जोगदंड यांचे पुत्र दिलीप हे २२ वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले. तेथे त्यांनी स्ट्रिंग कंट्रोल्ड दोरीवर विमान उडवून दाखविणे यावर संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. रेवा हिने बालपणातच यातून प्रेरणा घेतली. तेव्हापासून तिने पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते सत्यातही उतरले. 

हेलिकॉप्टरमधून वरात राज्यभरात ठरली चर्चेचीअर्धापूर तालुक्यातील कोंढा हे ३०० उंबरठ्याचे गाव असून येथील व्यवसाय हा शेती आहे. शेती व्यवसायातून काही कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सतत नवनवीन प्रयोग केले जातात. दोन वर्षांपूर्वी प्रगतशील शेतकरी राम कदम यांनी आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तिच्या लग्न समारंभात हेलिकॉप्टरमधून वरात काढून तिची सासरी पाठवणी केली होती. यामुळे कोंढा हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते. आता रेवाने विदेशात जाऊन गावाचे नाव रोशन केले आहे.

अमेरिकेत असतानाही गावकऱ्यांशी नाळ जुळलेली असून, नेहमी ते गावाकडील घडामोडींचा आढावा घेतात. आमचे बंधू दिलीप जोगदंड यांनी मुलापेक्षा मुलगी श्रेष्ठ म्हणत मुलगी रेवा हिला वैमानिक क्षेत्रात शिक्षण दिले. रेवामुळे सामान्य शेतकरी कुटुंबाचे नाव चर्चिले जात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.  - बालाजी जोगदंड, कोंढा, ता. अर्धापूर

टॅग्स :NandedनांदेडairforceहवाईदलUSअमेरिका