शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

महावितरणचा प्रताप! ग्राहकाला चक्क १६५ रुपये प्रति युनिटने दिले २४ हजारांचे ‘महा’बिल!

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: January 31, 2024 7:33 PM

मीटर रिडींग घेताना युनिटचे आकडे व्यवस्थित घेतले जात नसल्याने अव्वाच्या सव्वा बिल ग्राहकांना पाठवले जाते.

नांदेड : महावितरण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मीटर रिडींग आणि बिलातील तफावत हा घोळ नित्याचाच सुरू आहे. तरोडा बु. भागातील राधानागरी येथील ज्योती राम डोलारे या यांना प्रतियुनिट १६५ रुपयांप्रमाणे १४४ युनिटला तब्बल २३ हजार ८६० रुपयांचे बिल पाठवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महावितरणचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. महावितरणकडून वीज चोरी व वीज गळती रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. परंतु, या मोहिमेला अजूनही यश आलेले नाही. ज्या भागात जास्त वीज गळती असते, तेथील ग्राहकांचा भार नियमित वीजबिल भरणाऱ्या सामान्य ग्राहकांवर लादला जातो. मीटर रिडींग घेताना युनिटचे आकडे व्यवस्थित घेतले जात नसल्याने अव्वाच्या सव्वा बिल ग्राहकांना पाठवले जाते. त्यामुळे नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो.

तरोडा (बु.) भागातील राधानगरी येथे वास्तव्यास असलेल्या ज्योती डोलारे यांच्या घरात केवळ दोन दिवे आणि एक पंखा एवढीच उपकरणे आहेत. डोलारे यांना नियमित केवळ ५०० ते ६०० रुपयांपर्यंत वीजबिल येते. पण, महावितरणकडून मीटर रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्याने १४४ युनिट घेत प्रतियुनिट १६५ रुपयांप्रमाणे तब्बल २३ हजार ८६० रुपयांचे वीजबिल दिलेले आहे. डोलारे यांना एक महिन्याचे म्हणजे ऑक्टोबरचे बिल इतक्या मोठ्या रकमेचे दिले आहे. हे वाढीव बिल कमी करण्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून महावितरण कार्यालयात चकरा मारूनही संबंधितांकडून त्याची दखल घेतलेली नाही. महिना सात ते आठ हजार रुपयांत कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या डोलारे यांनी हे वीजबिल कसे भरावे? असा प्रश्न आहे.

चार महिन्यांपासून कार्यालयात चकराडोलारे यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात बिल दिले आहे. हे बिल कमी करावे, यासाठी मागील तीन ते चार महिन्यांपासून त्यांच्या महावितरणच्या कार्यालयात चकरा सुरू आहेत. परंतु, अद्यापही समाधानकारक बिल कमी केले नसल्याचे डोलारे यांनी सांगितले.

बिल भरायचे कसे? आमच्याकडे विजेचा वापर अतिशय कमी असून, दर महिन्याला ५०० ते ६०० रुपये इतकेच बिल येते. पण ऑक्टोबर महिन्याचे २३,८६० रुपये बिल दिल्याने खायचे काय आणि बिल भरायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.- ज्योती राम डोलारे, वीज ग्राहक

टॅग्स :Nandedनांदेडelectricityवीज