शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

आधार, पॅन कार्ड दिले, आता पीककर्जासाठी नवीनच नियम; शेतकरी झिझवतायत बँकांचे उंबरठे

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: June 19, 2024 19:28 IST

पीक कर्जासाठी झिझवावे लागताहेत बँकांचे उंबरठे

नांदेड : एकीकडे जिल्ह्यात खासगी सावकारांचे फावलेले असताना दुसरीकडे बँकाही शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे ही कर्ज प्रक्रियेची फाईल मंजूर करवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांचे उंबरठे झिझविण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत खरीप हंगामात २७.५७ टक्केच पीक कर्ज वाटप झाले असून, बँकांनी आखडता हात घेतल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांना पेरणीपूर्वीच खते, बियाणे, औषधांची खरेदी करण्यासाठी वेळेवर पैशाची उपलब्धता झाली नाही तर खासगी सावकार किंवा अन्य कुणाकडून तरी उसनवारी पैसे घेऊन पेरणी करावी लागते. शेतकऱ्यांना कोणत्याही सावकाराच्या दारात जाण्याची गरज पडू नये, यासाठी दरवर्षी रब्बी आणि खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात येते. परंतु बँकांकडून कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध होत नसल्याने पेरणीसाठी आर्थिक चणचण भासत आहे.

जिल्ह्याला खरीप हंगामासाठी १८२ कोटी ५७३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर रब्बी हंगामासाठी ६८ कोटी ५२ लाखांचे, असे एकूण मिळून २५१ कोटी ९६ लाखांचे उद्दिष्ट दिलेले आहे. त्यात खरीप हंगामाचे १० जूनअखेर ५७ हजार ९४६ सभासदांना ५० कोटी ३३ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. तर अनेक शेतकऱ्यांना अजूनही कर्ज मिळण्यासाठी बँकेत येरझारा माराव्या लागत आहेत.

खासगी, व्यापारी बँकांकडून १३ टक्केच वाटपखरीप हंगामात विविध बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेला ४१ कोटी ६९ लाख, व्यापारी, खासगी बँकांना ९९ कोटी ३१ लाख, तर ग्रामीण बँकांना ४१ कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यातील खासगी, व्यापारी बँकांनी १३.१९ टक्के, जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३६.५५ टक्के, तर ग्रामीण बँकांनी ५२.५७ टक्के इतके पीक कर्ज वाटप केले आहे. सरासरी जिल्ह्यातील बँकांनी २७.५७ टक्के इतके पीक कर्जाचे वाटप केलेले आहे.

आधार झाले, पॅन कार्डही झाले, आता नवीनच काढला नियमपीक कर्जासाठी आधार, पॅन आवश्यक करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी ते काढले आहेत. मात्र, यावेळी शासनाने नवीन एक अट टाकली आहे. यामध्ये आधार, पॅन कार्ड, बँक खाते व सातबारा नोंदीवरील नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडासाही बदल असल्यास, अशा शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सर्व शेतकऱ्यांनी आधार, पॅन सेतू केंद्रातून काढले आहेत. तसेच अनेकांच्या आधार, पॅन कार्ड, बँक खाते व सातबारा नोंदीवरील नावात साधर्म्य दिसून येत नाही. त्यांच्या पूर्ण नावाच्या स्पेलिंगमध्ये कुठे ना कुठे चूक आढळून येत आहे. परिणामी, ऐनवेळी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत असून, आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या नवीन नियमाचा फटका बसण्याची भीती आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जNandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी