श्वान घरात आणणे जेवढे सोपे आहे, तेवढेच त्याचा सांभाळ करणे, त्याला चांगल्या सवयी लावणे हे काम कठीण आहे. त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी नांदेडात विशेष ट्रेनरही उपलब्ध आहेत. त्याचबरोबर श्वानाला लागणारे खाद्य, त्याचे साहित्य तसेच वैद्यकीय खर्चही महागडा आहे. काही श्वानपालकांकडून महिन्याकाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च केला जातो.
चौकट...
१) सायबेरियन हस्की दिसायला खूपच गोड असतो. सध्या त्याची किंमत ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे.
२) डॉबरमॅन हे शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्यांपैकी एक श्वास असून, त्याची किंमत सध्या १२ हजार ते ४० हजार एवढी आहे.
३) रॉटविलर जातीचा श्वानाच्या किमती ३० हजार ते एक लाखापर्यंत आहे. या श्वानाला जसे शिकवले तसे काम तो करतो.
४) सर्वाधिक प्रमाणात घरी पाळला जाणारा श्वान म्हणून लॅब्राडाॅरला मागणी आहे. त्याची किमती १२ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत आहेत.
५) गोल्डन रॉट्रीव्हर हा जगातील सर्वात लोकप्रिय श्वान आहे. त्याची किंमत ३० हजार ८० हजारापर्यंत आहे. परंतु, आपल्याकडे अधिक प्रमाणात हा पाळला जात नाही.
लॉकडाऊनपासून श्वानांची मागणी वाढली आहे. पाळीव प्राण्यांची आवड असल्यामुळे हा व्यवसाय करतो. यातून उत्पन्नापेक्षा आपण कुणाच्या घरी एक सदस्य देताेय, याचा आनंद अधिक असतो. त्यामुळे श्वान कशाप्रकारे सांभाळणार याविषयीदेखील आम्ही खरेदीदाराकडे विचारणा करतो. - मनप्रीतसिंग कांचवाले, विक्रेता, नांदेड
छंद आणि सुरक्षादेखील
श्वान पाळण्याचा छंद लहानपणापासूनच आहे. पाळीव प्राणी माणसांपेक्षा जास्त जीव लावतात. त्यांचा लळा लागल्यानंतर आपोआपाच आवडही निर्माण होते. तसेच श्वानांमुळे घराची सुरक्षादेखील होते. पूर्वी माझ्याकडे चार श्वान होते. सध्या रॉटविलर आणि सायबेरियन हस्क हे दोन श्वान आहेत.
- विनोद पावडे, श्वान पालक
शेतात असलेल्या श्वानाची आवड निर्माण झाली आहे. मी नेटवरून विविध श्वानांची माहिती घेतली असून, लवकरच जर्मन शेफर्ड आमच्याकडे येणार आहे. सध्या गावरान प्रजातीचे दोन श्वान आहेत. त्यांनादेखील आम्ही योग्य प्रशिक्षण दिले आहे. ते रात्रीला आखाड्यावर मोकळे सोडले जातात. त्यामुळे चोरीची भीती नाही.
- संकेत नादरे, श्वान पालक