अनेकांनी मुहूर्त काढून अर्ज भरण्याचे नियोजन केले आहे. महायुती सरकारच्या काळात सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार त्यावेळच्या निवडणुका पार पडल्या. मात्र, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि थेट सरपंच निवड रद्द करण्यात आली. आता सरपंच निवड सदस्यांमधून होणार आहे. त्यामुळे या निर्णयावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. बहुमत मिळूनही सरपंचपदापासून दूर राहण्याची शक्यता आजपर्यंत सरपंच आरक्षणानुसार उमेदवार उभे केले जात होते. मात्र, यावर्षी प्रथमच मतमोजणीनंतर सरपंच आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे पॅनल प्रमुखांची मोठी अडचण झाली आहे. बहुमत आलेल्या पॅनलकडे सरपंच आरक्षणाचा उमेदवार नसेल आणि तो विरोधी गटाकडे असेल तर तो सरपंच बिनविरोध होणार आहे. त्यामुळे अशा पॅनलला बहुमत येऊनही सरपंचपदापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.
लोहा तालुक्यात दुसऱ्या दिवशी ६ अर्ज दाखल
लोहा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींसाठी दि. २३ ते ३० डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी तालुक्यात एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. लोहा तहसील येथे २८ टेबलद्वारे सर्व ८४ ग्रामपंचायतींसाठी तालुक्यात १ लक्ष ७४ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी २८ निवडणूक निर्णय अधिकारी व ४० सहायक निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती तसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली.