नांदेड आगाराची शिवशाही (क्र. एमएच ०६ बीडब्ल्यू ४४१३) नांदेड- हैदराबाद धावत होती. नांदेडहून ही बस रात्री अकरा वाजता निघाली. पहाटे चार वाजेच्या सुमारास तेलंगणा राज्यातील कामारेड्डी शिवारातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरली. त्यानंतर बसने तीन पलट्या घेतल्या. बसमध्ये यावेळी एकूण ३६ प्रवासी होते. त्यातील १७ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. सर्व जखमींना कामारेड्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसवर विजयकुमार वाघवसे हे चालक तर अब्दुल करीम हे वाहक होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बिलोलीचे आगार व्यवस्थापक चंद्रशेखर समर्थवाड आणि यंत्र अभियंता अशोक पन्हाळकर हे घटनास्थळी रवाना झाले होते. यावेळी जखमींना महामंडळाकडून तात्पुरती मदत देण्यात आली आहे.
नांदेड आगाराच्या शिवशाहीला तेलंगाणात अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:16 AM