शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

अतिरिक्त शिक्षकांना आठ दिवसांत घेणार सामावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 1:15 AM

संच मान्यतेनूसार शााळामधील विद्यार्थी संख्या कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरीक्त ठरले होते़ या अतिरीक्त शिक्षकांची यादी शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आली असून, या यादीवर काही आक्षेप असल्यास मुख्याध्यापक, शिक्षकांना सोमवारपर्यंत पुराव्यासह ते नोंदवावे लागणार आहेत़

ठळक मुद्देजिल्हा परिषद आक्षेप नोंदविण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत

विशाल सोनटक्के।नांदेड : संच मान्यतेनूसार शााळामधील विद्यार्थी संख्या कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरीक्त ठरले होते़ या अतिरीक्त शिक्षकांची यादी शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आली असून, या यादीवर काही आक्षेप असल्यास मुख्याध्यापक, शिक्षकांना सोमवारपर्यंत पुराव्यासह ते नोंदवावे लागणार आहेत़ दरम्यान, गुरुवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत अतिरीक्त शिक्षकांना आठवडाभरात सामावून घेण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले़सन २०१७-१८ च्या संच मान्यतेनूसार खाजगी प्राथमिक शाळातील तब्बल १२० शिक्षक अतिरीक्त ठरले होते़ तर जि़प़ प्राथमिक शाळेतील ६ शिक्षक अतिरीक्त निघाले होते़ दुसरीकडे संच मान्यतेनूसार खाजगी प्राथमिक शाळेत २२ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे पुढे होते़ खाजगी प्राथमिक शाळातील मराठी माध्यमाच्या ७ शिक्षकांची पदे तर उर्दु माध्यमाची १० पदे रिक्त आहेत़ याबरोबरच जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळामध्ये उर्दु माध्यमाची १९ पदे आणि मराठी माध्यमाची ३ पदे रिक्त असल्याने एकीकडे शिक्षक अतिरीक्त तर दुसरीकडे विद्यार्थी असूनही शिक्षक नसल्याचे चित्र होते़ अतिरीक्त शिक्षकांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा या अनुषंगाने मागील काही दिवसापासून शिक्षकांच्यावतीने आंदोलनही करण्यात येत होते़ या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हयातील प्राथमिक शाळांतील अतिरीक्त शिक्षक व रिक्त पदे असलेल्या शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे़

शिक्षण सेविका सुंकणीकर यांचे पद होणार रद्दशिक्षण सेविका ज्योती सुंकणीकर यांची निवड अनुसूचित जाती प्रवर्गातून झाली असताना त्यांचा प्रवर्ग बदल करुन त्यांची निवड सर्वसाधारण करण्यात आली़ याबाबतीत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी बनावट कागदपत्रे तयार करणा-याविरुद्ध कारवाई केली असून, इतर अधिकारी, कर्मचा-यांचीही चौकशी सुरु आहे़ या कर्मचा-यावरही कारवाईची मागणी या बैठकीत पुढे आली़ दरम्यान, सुंकणीकर यांच्यावर कारवाई का होत नाही असा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला़ यावर त्यांचे पद रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले़

प्रसिद्ध केलेल्या यादीवर मुख्याध्यापक, शिक्षकांचे काही आक्षेप असल्यास ते मुख्याध्यापकामार्फत पुराव्यासह २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीकाकडे सादर करावयाचे आहेत़ दरम्यान, गुरुवारी सभापती माधवराव मिसाळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची बैठक पार पडली़ या बैठकीला जि़प़सदस्या मंगाराणी अंबुलगेकर, साहेबराव धनगे, व्यंकटराव गोजेगावकर, संध्याताई धोंडगे, अनुराधा पाटील, ज्योत्सना नरवाडे यांच्यासह अशोक देवकरे, बंडू आमदुरकर, एरपुलवार आदींची उपस्थिती होती़ या बैठकीतही अतिरीक्त शिक्षकांचा प्रश्न उपस्थित झाला असता येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत या शिक्षकांना सामावून घेण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांनी सांगितले़ याच बैठकीत शिक्षण विभागाचा अभ्यास कच्चा असल्याचे पुन्हा निदर्शनास आले़ सदस्यांनी शिक्षणाचा हक्क कायद्यानूसार इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये किती जागा उपलब्ध आहेत व किती जागावर विद्यार्थींना प्रवेश देण्यात आला याबाबतची माहिती विचारली असता अधिकाऱ्यांकडे ही माहिती उपलब्ध नव्हती़ अशीच बाब खाजगी इंग्रजी शाळांच्या माहिती संदर्भात दिसनू आली़ सदरील इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शिक्षक, पालक समिती गठीत केली आहे किंवा नाही आणि केली असेल तर जिल्हयातील किती शाळांनी या समितीची स्थापना केली याची माहिती सदस्यांनी तीन महिन्यापूर्वी विचारली आहे़ परंतू अद्यापपर्यंत शिक्षण विभागातर्फे ही माहिती देण्यात आलेली नाही़ गुरुवारच्या बैठकीतही सदस्यांनी ही माहिती मागविली असता शिक्षणाधिकाºयांकडे माहिती उपलब्ध नव्हती़ नेहमीप्रमाणे माहिती घेवून उत्तर देतो असे शिक्षणाधिका-यांनी सांगितले़ बैठकीत आॅनलाईन बदली प्रक्रियेतील आंतरमोजणीचा मुद्दाही उपस्थित झाला़आंतरजिल्हा बदलीची संचिका प्रलंबित; नोटीस बजावण्याचे आदेशशिक्षण समितीच्या बैठकीत शिक्षकांच्या निवडश्रेणीचा मुद्दा उपस्थित झाला़ सतत २४ वर्षे सेवापूर्ण झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी देण्याबाबतची कार्यवाही तीन महिन्यानंतरही पूर्ण झालेली नाही़ याबाबत सदस्यांनी संताप्त व्यक्त केला़ याबरोबराच आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या प्रतिक्षा कालावधीची संचिका वर्षभरापासून प्रलंबित असल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी उपस्थित केला़ याप्रश्नी दिरंगाई करणा-या संबंधीत अधिकारी, कर्मचा-याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली़ यावर शिक्षण सभापतींनीही शिक्षणाधिकाºयावर ताशेरे ओढत संबंधीत कर्मचारी, अधिका-यांविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले़ 

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदTeacherशिक्षकTransferबदलीSchoolशाळा