शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नांदेड जिल्ह्यात ६६ परवानाधारक मद्यविक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:41 PM

बारमध्ये ग्राहकांच्या असुविधेसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग ५० हजारापर्यंतचा दंडही ठोठावू शकते़ दरम्यान, गत सहा महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ५० लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ अशी माहिती अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली़

ठळक मुद्देसहा महिन्यात पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : वेळेच्या अगोदर मद्यविक्रीची दुकाने उघडून रात्री उशिरापर्यंत ती सुरु ठेवणाऱ्या तसेच बारमध्ये असुविधा असलेल्या परवानाधारक ६६ मद्य विक्रेत्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे़ बारमध्ये ग्राहकांच्या असुविधेसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग ५० हजारापर्यंतचा दंडही ठोठावू शकते़ दरम्यान, गत सहा महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ५० लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ अशी माहिती अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली़जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहाटेच मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येतात़ त्यानंतर रात्री उशिरापर्यत ती सुरु ठेवण्यात येतात़ त्याचबरोबर अनेक ठिकाणी ग्राहकांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसते़ प्रसाधनगृह, किचन यासह इतर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाºया परवानाधारक ६६ मद्य विक्रेत्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या सहा महिन्यात कारवाईचा बडगा उगारला आहे़ त्याचबरोबर एप्रिलमध्ये १५४, मे-१३८, जून-१३५, जुलै-१३४, आॅगस्ट-१३१ व सप्टेंबरमध्ये ११७ असे एकुण ८०९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ त्यामध्ये गुणात्मक गुन्ह्यांची संख्या २४ आहे़या प्रकरणात ५६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे़ त्यांच्याकडून मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ५६ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत़ या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५० लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ गतवर्षी एकुण ७७१ गुन्हे नोंदविण्यात आले होते़ तर १४ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ गेल्या सहा महिन्यांमध्ये अवैध दारु विक्रीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहिम तीव्र केली आहे़ दरम्यान, वारंवार अवैध दारु विक्रीचे गुन्हे करणाºया आरोपींना जरब बसावी यासाठी त्यांच्या विरोधात हद्दपारीचे प्रस्ताव तयार करुन पाठविण्यात आले आहेत़जप्त वाहने ठेवण्यासाठी जागा अपुरी४राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय हे किरायाच्या इमारतीत आहे़ त्यामुळे या ठिकाणी जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी जागाच नाही़ त्यावर तोडगा म्हणून एका ठिकाणी जागा किरायाने घेवून त्या ठिकाणी ही वाहने ठेवण्यात येत आहेत़ परंतु ही जागाही आता अपुरी पडत आहेत़ त्यामुळे जप्त केलेली वाहने नेमकी ठेवायची कुठे? असा प्रश्न विभागाला पडला आहे़

 

टॅग्स :Nandedनांदेडalcohol prohibition actदारुबंदी कायदा