नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्यानंतर जून अखेरपर्यंत उपलब्ध पाणी कसे राखून ठेवता येईल, यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या असून आता पाण्याचा अपव्यय करणाºयाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी दिली आहेत.जिल्ह्यात चालूवर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यात विष्णूपुरी प्रकल्पातील पाण्याचे संरक्षण करण्यात अपयश आल्याने नांदेड शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे विष्णूपुरी प्रकल्पातून होत असलेला अवैध पाणीउपसा वेळीच न रोखल्याने विशेषत: दक्षिण नांदेडवर तीव्र जलसंकट ओढवले आहे. विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ २.१६ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. भविष्यात शहराला लागणारा पाणीसाठा आणि उपलब्ध जलसाठा यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे आहे त्या पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे झाले आहे.शहरावर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवलेले असताना शहरातील काही भागांत मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याची बाब पुढे आली आहे. विविध ठिकाणी पाण्याचा वापर गाड्या धुण्यासाठी, बांधकामासाठी, घरासमोरील रस्ता धुण्यासाठी, मिनरल वॉटर प्लान्टसाठी तसेच अन्य बाबींसाठी पाण्याचा मोठा अपव्यय सुरू होता.पाण्याचा सुरू असलेला अपव्यय थांबवण्यासाठी महापालिकेने उत्तर नांदेड आणि दक्षिण नांदेडसाठी दोन स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. हे पथक शहरात पाण्याचा अपव्यय करणाºयाविरुद्ध कारवाई करणार आहे. प्रसंगी गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पथकाने कारवाईचा अहवाल दररोज सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.उत्तर नांदेडच्या पथकाची जबाबदारी मालमत्ता व्यवस्थापक राजेश चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या पथकात साहेबराव जाधव, हरदीपसिंघ सुखमणी, अनिल जोशी, भिवाजी वडजे, मोतीराम गवळे, संजय गितले, आनंद कांबळे यासह मनपा पोलीस पथकातील एका कर्मचाºयाचा समावेश राहणार आहे.दक्षिण नांदेडमध्ये होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नागरी उपजीविका अभियानाचे प्रकल्प व्यवस्थापक अशोक सूर्यवंशी हे पथक प्रमुख राहणार आहेत. या पथकात राजेंद्र सरपाते, आयुब खान, गणपत भुरे, शेख खदीर, बाबूराव ढोले, अरुण कठाडे तसेच एका पोलीस कर्मचा-याचा समावेश राहणार आहे.या पथकांनी मंगळवारी विविध भागात भेटी दिल्या. पहिल्या दिवशी समज दिल्याचे पथकप्रमुख राजेश चव्हाण यांनी सांगितले.
पाण्याचा अपव्यय करणाऱ्याविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:37 AM
विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्यानंतर जून अखेरपर्यंत उपलब्ध पाणी कसे राखून ठेवता येईल, यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या असून आता पाण्याचा अपव्यय करणाºयाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी दिली आहेत.
ठळक मुद्देपाणीटंचाई : महापालिकेने केली दोन विशेष पथकांची स्थापनापहिल्या दिवशी दिली समज