लोहा (नांदेड ) : राज्यभरात लागू झालेल्या प्लॅस्टिक बंदीची नगर पालिकेने कठोर अंमलबजावणी सुरु केली आहे. आज शहरात प्लॅस्टिक वापर व विक्री करणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नगर पालिकेचे मुख्याधिकारी अशोक मोकले यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरात दिवसभर प्लॅस्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात आली. या मोहिमेत पथक प्रमुख बाबाराव चव्हाण व कार्यालयीन अधिक्षक उल्हास राठोड यांच्या नेतृत्वाखाली पालिकेतील कर्मचारी सहभागी झाले. यावेळी शहरात प्लॅस्टिक वापर व विक्री करणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे प्लॅस्टिकचा वापर व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.