नांदेड : धर्माबाद उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या पथकाने गेल्या तीन दिवसांत धर्माबाद हद्दीमध्ये सात ठिकाणी धाडी मारल्या़ या धाडीमध्ये १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १६ आरोपींच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़हसन यांच्या पथकातील एका कर्मचाऱ्याला अनोळखी व्यक्तीचे पॉकेट सापडले होते़ त्यामध्ये ३ हजार ६०० रुपये आणि ओळखपत्रे होती़ त्या व्यक्तीचा शोध घेवून त्याला ते परत करण्यात आले. २४ जून रोजी धर्माबाद शहरातील रत्नाळी भागात अवैधपणे रेतीची वाहतूक करणा-या एक टिप्पर व ट्रॅक्टरला पकडण्यात आले़ ४ ब्रास रेती आणि ७ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़यावेळी शे़मस्तान शे़बाबूमियॉ, शेख मुजाहिद शेख बाबूमियॉ व राहुल तुपसाखरे या तिघांना पकडले़ धर्माबाद ते कारेगाव रस्त्यावर आणखी दोन ट्रॅक्टर पकडून १ ब्रास रेतीसह ६ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला़ मारोती लाब्दे , गजानन लाब्दे, अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला़ २६ जून रोजी रत्नाळी शिवारात जुगार खेळणा-या बालाजी बेंद्रे, शेख अकबर शेख उस्मान, गजानन सूर्यवंशी, आनंदा गायकवाड, प्रभू आरेवार, पंढरी कुंडलवाडे व गंगाधर जल्लोड यांना पकडण्यात आले़ २७ जून रोजी आंध्रा बसस्थानक परिसरात पेट्रोल आणि डिझेलची विक्री करणा-या राजेंद्र मुपडे याला पकडून २ हजार रुपयांचे पेट्रोल, डिझेल जप्त केले़गुटखाही केला जप्तबन्नाळी चौक परिसरात अवैधरित्या गुटख्याची विक्री करणाºया शेख वासिक शेख अहमद राक़रखेली याला पकडून ३ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला़ बाळापूर रोड परिसरातील शंकर पाटील कॉम्प्लेक्सजवळ शेख रियाज शेख युसूफ चौधरी याच्या ताब्यातील ४० लिटर पेट्रोल आणि १२ लिटर डिझेल जप्त केले़ सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या पथकाने तीन दिवसांत कारवायांचा धडाका लावला आहे़
तीन दिवसांत सात ठिकाणी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:29 IST
धर्माबाद उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या पथकाने गेल्या तीन दिवसांत धर्माबाद हद्दीमध्ये सात ठिकाणी धाडी मारल्या़
तीन दिवसांत सात ठिकाणी कारवाई
ठळक मुद्देनुरुल हसन : १४ लाखांचा मुद्देमाल जप्त