नांदेड : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून साधारणपणे दुपारी १ वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे़ यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली़नांदेड लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे़ २३ मे रोजी शहरातील माहिती व तंत्रज्ञान इमारत, शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी मतमोजणी होणार आहे़ अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपलेल्या निवडणूक निकालासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे़ या कामासाठी साडेपाचशे कर्मचारी नियुक्त केले असून सुरक्षेच्या दृष्टीने केंद्राच्या ठिकाणी पाचशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा राहणार आहे़ निवडणुकीचा निकाल शांततेत व वेळेवर लागण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत़ यासंदर्भात जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, ईव्हीएमवरील मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल़ एकूण सहापैकी कोणत्याही पाच मतदारसंघाची मतमोजणी सुरूवात झाल्यानंतर उर्वरित एका मतदारसंघाची साठेआठ वाजता मतमोजणी सुरू करण्यात येईल़ प्रत्येक मतदारसंघात एकूण १४ मतमोजणी टेबल असतील. त्यासाठी प्रत्येकी एक मतमोजणी प्रतिनिधी राहणार आहे़ टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त केला आहे़ प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणसाठी स्वतंत्र रंगाचे ओळखपत्र असल्यामुळे त्या मतदारसंघात नियुक्ती करण्यात आली आहे़ मतमोजणी केंद्रावर सर्व संबंधितांनी शिस्तीत वागणे अनिवार्य केले आहे़एखाद्या ईव्हीएममधून तांत्रिक कारणामुळे निकाल डीसप्ले होत नसेल अशावेळी बीईएल इंजिनियरमार्फत सदर युनिट तपासण्यात येईल़ त्यानंतरही जर डीसप्ले येत नसेल तर असे युनिट पुन्हा केसमध्ये ठेवून याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात येईल़ अशा परिस्थितीत ईव्हीएम मतमोजणीच्या संपूर्ण फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर डीसप्ले न होत असलेल्या ईव्हीएमचे व्हीव्हीपॅट मतमोजणी कक्षात आणले जातील व व्हीव्हीपॅटमधील स्लीप्सची मतमोजणी करण्यात येईल़ त्याद्वारे प्रत्येक उमेदवाराला किती मते पडले, याचा अहवाल अंतिम करण्यात यईल़ ईव्हीएम व टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्यात येईल़सहा विधानसभेच्या ४९ फे-याया निवडणुकीत एकूण ११ हजार ४४२ टपाली मतदान होते़ त्यापैकी ७ हजार ८८१ मतदान झाले़ तर १ हजार ५०७ सैनिकांचे मतदान होते़ त्यापैकी ९०० मतदान झाले़ चार विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी २५ फेऱ्यांतून पूर्ण होणार असून भोकर व दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी २४ फेºयांत पूर्ण होणार आहे़ मतमोजणी केंद्रावर मोबाईल, कॅमेरा, आॅडीओ, व्हीडीओ रेकॉर्डर, पेन, आदी कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई आहे़
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:23 AM
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून साधारणपणे दुपारी १ वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे़ यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली़
ठळक मुद्देजिल्हाधिकारी डोंगरे यांची माहिती ५५० कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त