शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

सासऱ्याला हरवून पत्नी थेट सरपंचपदी, पण पती सदस्यत्वाच्या निवडणुकीत मामीकडून पराभूत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 7:06 PM

कंधार तालुक्यातील इमामवाडीत ग्रामपंचायत येथे लक्षवेधी लढत; सदस्यपदासाठी पतीचा मात्र मामी नंदा गायकवाड यांनी अवघ्या एका मताने पराभव केला.

कंधार (नांदेड): तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीची आज मतमोजणी तहसील कार्यालय येथे पार पडली. अनेक गावात सत्ता परिवर्तन झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. तालुक्याचे लक्ष लागलेल्या इमामवाडीत सासूबाईंच्या भावाचा पराभव करून थेट सरपंचपदी शाहुताई कांबळे विजयी झाल्या. मात्र पतीचा ग्रामपंचायत सदस्य जागेवर एका मताने मामीकडून धक्कादायक पराभव झाला.

तालुक्यातील १६ पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध पार पडली. १२ ग्रामपंचायतीत गाव पुढाऱ्यानी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.त्या गावातील निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयात दि.२० डिसेंबर रोजी पार पडली.गाव लहान असले तरी सहा सदस्य बिनविरोध काढण्यात आले.परंतु सरपंचपद व एका सदस्यासाठी सख्ये नातेवाईक निवडणुकी निमित्ताने आमनेसामने आले होते.त्यामुळे या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.शाहुताई सुनील कांबळे यांनी सासुबाईच्या भावाचा पराभव केला.सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते.  सदस्यपदासाठी पतीचा मात्र मामी नंदा गायकवाड यांनी अवघ्या एका मताने पराभव केला.

मानसपूरीत दिग्ज पुढारी एकीकडे असताना सुद्धा सत्ता परिवर्तन होऊ शकले नाही.सरपंच म्हणून मेघा डुकरे या  मोठ्या फरकाच्या मताने विजयी झाल्या .या गावातच सदस्य पदासाठी प्रभाग दोन मध्ये सख्या जाऊबाई  आमनेसामने आल्या होत्या. परंतु चावूत्राबाई सुर्यवंशी यांनी आपल्या जाऊबाईचा पराभव केला.प्रभाग एक मध्ये सर्वसाधारण स्त्री जागेवर रोहिणी चिवळे एका मताच्या फरकाने विजयी झाल्या.

ईश्वर चिठ्ठीने विजयचौकी धर्मापूरी येथे सरपंचपद सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित होते.अनुजा इंगळे या थेट सरपंचपदी निवडून आल्या.प्रभाग दोन मध्ये अत्यंत काटा लढत सदस्यासाठी झाली.सर्वसाधारण जागेसाठी परमेश्वर गिते व बालाजी मेकलवाड यांना समान ८२ मते प्रत्येकी पडली.त्यात ईश्वर चिठ्ठीने परमेश्वर गिते विजयी झाले. सर्वसाधारण स्त्री जागेसाठी जमुनाबाई डुबुकवाड या एका मताच्या फरकाने विजयी झाल्या.

नवरंगपूरा गावात सत्ता परिवर्तन झाले. सरपंचपदी शंकर बामनवाड विजयी झाले. जंगमवाडी सरपंचपदी शिवनंदा वाडीकर विजयी .श्रीक्ष्रेत्र उमरज सरपंचपदी जयश्री केंद्रे विजयी.सावरगाव नि.येथे सरपंचपदी  चऊत्राबाई धर्मेकर विजयी.पोखर्णी येथे सरपंचपदी रमेश केंद्रे विजयी.लालवाडी सरपंचपदी कोमल बोंबले विजयी. सोमठाणा -रेवताबाई गिते विजयी. मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी  परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अनुपसिंह यादव यांनी प्रयत्न केले.त्यांना नायब तहसीलदार संतोष कामठेकर, नायब तहसीलदार नयना कुलकर्णी ,अव्वल कारकून पी.एम.जोंधळे व मन्मथ थोटे, मंडळ अधिकारी एच.एन.सुजलेगावकर ,एस.आर.शेख,चंद्रकांत महाजन ,सतिश शिंदे ,एस.एम.पटणे,केंद्र प्रमुख एन.एम.वाघमारे आदीनी सहकार्य केले.पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

कोटबाजार- मोहम्मद अजीमोद्दीन निजामोद्दीन विजयी.दिग्रस खु - भिमराव कल्याणकर विजयी.

बिनविरोध सरपंच :गुलाबवाडी -मैनाबाई जोगदंड.पाताळगंगा -लक्ष्मी मुंडे.घुबडवाडी -वंदना सोनकांबळे.गांधीनगर -तुकाराम जाधव.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNandedनांदेड