परिसरात शिरड येथे ९ वी ते १०वी तर निवघा बाजार येथे ९ वी ते १२ वी वर्ग तर कोळी येथे ९ वी ते १० वी दोन वर्ग, उंचेगाव ( बु.) ९ वी ते १० वी दोन वर्ग तर तळणी येथे ९ वी ते १२ वी असे चार वर्ग शाळा सुरू झाल्या आहेत .
शासनाच्या नियमानुसार शाळा सुरू होण्याच्या पूर्व संध्येला शाळा सॅनिटायझर करुन घेतल्या तर शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थांना मास्क अनिवार्य असून सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन केल्या जात आहे . शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलामुलींचे मशीने ट्रेम्पचर तपासणी करुनच शाळेच्या प्रांगणात सोडण्यात येत आहे . शाळा सुरू झाल्याने प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शाळेची घंटा कानावर पडली आहे तर विद्यार्थांनी शाळा फुलून गेल्या आहेत . विद्यार्थांच्या प्रत्येक पालकाकडून शाळेकडून हमी पत्र घेण्यात आले.
रस्ता दुरवस्था
मांडवी : आठ -दहा गावासाठी महत्वाचा एकमेव मार्ग ठरलेल्या पिंपळगाव-कनकी-कोठारी या ओबड-धोबड डांबरी रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सा.बा.उप विभाग किनवट याच्या कार्यक्षेत्रात मोडणारा पिंपळगाव-कनकी-कोठारी हा सहा किमीचा डांबरी रस्ता सध्या वाहतुकीसाठी खूप कठीण बनला आहे. मोटारसायकल चालक आता मुख्य डांबरी रस्ता सोडून बाजूने मार्गस्थ होत आहे. हा डांबरी रस्ता मोठ्या प्रमाणात उखडून गेला आहे. किनवट, अदिलाबाद ये-जा करण्यासाठी हा मार्ग-कनकी, डोंगरगाव, जरूर तांडा, कोठारी, हिरापुर, जमुना नगर, रामजी नाईक तांडा, जरूर गाव, लक्ष्मीनगर, कनकी तांडा आदी गावा करीत हा रस्ता मह्त्वाचा मार्ग बनला आहे. संभाव्य रस्ता अपघात टाळण्यासाठी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रशांत रेड्डी, निशांत जाधव, आंबादास वाडगुरे, गोविंद गुरणूले, पोचीराम सुकलवार इत्यादी केली आहे.