भाजपकडून अर्धापुरात अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2023 04:36 PM2023-01-02T16:36:40+5:302023-01-02T16:36:56+5:30
अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली.
अर्धापूर (जि. नांदेड ): शहरात व कामठा येथे भाजपच्यावतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे वादग्रस्त विधान अजित पवारांनी केले होते. संभाजी महाराज यांनी धर्म व स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिल्याने ते धर्मवीर व स्वराज्यारक्षकही आहेत. पवारांनी आमच्या श्रद्धास्थानावर घाव घातला आहे, असा आरोप करत भाजप पदाधिकारी यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारून दहन केले.
अजित पवारांनी याबाबत माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष जठन मुळे, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा इंगोले, उपाध्यक्ष आनंद वैद्य, सरचिटणीस तुळशीराम बंडाळे, सरचिटणी संतोष पवार, उपाध्यक्ष कुश भांगे, हेमंत देशमुख, विश्वनाथ खुळे, निलेश आपणगिरे, देविदास कल्याणकर, रवी इंगळे, सरचिटणीस परमेश्वर लालमे, महेश राजगोरे, मुंजाजी राजेगोरे आदींचा सहभाग होता.
तसेच अर्धापूरात पु.अहिल्याबाई होळकर चौकात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्रतिमेला जोडे मारून दहन करण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी,गटनेते बाबुराव लंगडे,जिल्हा चिटणीस डॉ.लक्ष्मण इंगोले, विलास साबळे, रामराव भालेराव,सरचिटणीस अवधूतराव कदम,योगेश हाळदे,राजू आबादार,अमोल कपाटे,तुकाराम साखरे,तुकाराम माटे यांच्या अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थितीत होते.