येथील अखंड हरिनाम सप्ताहात अनेक नामवंत कीर्तनकारांनी कीर्तनाची सेवा केली. येथे रोज विविध धार्मिक कार्यक्रम यामध्ये काकडा, पारायण, गाथाभजन, हरिपाठ आदी पार पडले. १३ रोजी गाथापूजन, ज्ञानेश्वर माउली समाधी उत्सव व पालखी नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडला. यामध्ये सर्व भजनी, माताभगिनी, व भक्तगण मंडळींनी सहभाग नोंदवत माउलींचा गजर केला. यावेळी सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. १४ रोजी सकाळी ह.भ.प. योगेश महाराज गौंडगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. यावेळी असंख्य भाविक भक्तांनी या नामसंकीर्तनाचा लाभ घेतला. मृदंगसेवा मृदंगाचार्य उत्तम पाटील गुजरीकर तर सखाराम पाटील हिप्परगेकर, बिरु महाराज, महाजन पाटील व गावातील भजनी मंडळींनी गायन सेवा केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 4:33 AM