शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

नांदेडसह परभणी, हिंगोलीकरांनी थकविले २,३५९ कोटींची वीजबिले

By प्रसाद आर्वीकर | Published: December 15, 2022 4:06 PM

तीन जिल्ह्यात एकूण ८ लाख वीजबिल थकबाकीदार आहेत

- प्रसाद आर्वीकरनांदेड :नांदेडसहपरभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सुमारे ८ लाख वीज ग्राहकांकडे महावितरणची २,३५९ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीचा आकडा प्रत्येक महिन्यात वाढतच असल्याने सुरळीत वीज सेवा देताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

घरा-घरात वापरल्या जाणाऱ्या विजेची गणना राष्ट्रीय संपत्तीमध्ये होते. महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या माध्यमातून या विजेचा पुरवठा केला जातो आणि दिलेल्या विजेचे बिलही वसूल केले जाते. वसूल झालेल्या या बिलांमधून वीज वितरण विषयक सुविधा निर्माण केल्या जातात. मात्र वीजबिल थकविण्याचे प्रमाण वाढत गेल्याने थकबाकीचा डोंगर तयार झाला आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांचे नांदेड परिमंडळ असून, या कार्यालयातून वीज सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या बोटावर मोजण्याएवढीच आहे.तीनही जिल्ह्यातील ग्राहकांचा विचार करता ७ लाख ९८ हजार ५२९ ग्राहकांकडे तब्बल २३५९ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे. कृषिपंपधारकांकडे सर्वाधिक ११०६ कोटी ३१ लाख ५२ हजार रुपयांची थकबाकी आहे. ४ लाख ४४ हजार ४२४ घरगुती ग्राहकांकडे ३७७ कोटी ८१ लाख ३५ हजार, २६ हजार ८८० व्यावसायिकांकडे ९ कोटी ८८ लाख, ५ हजार ६३४ उद्योजकांकडे ४ कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी आहे.

पथदिवे अन् पाणीपुरवठ्याच्या बिलाचाही नाही पत्तातिन्ही जिल्ह्यांमध्ये पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांकडे मोठी थकबाकी आहे. पथदिव्यांच्या वीज बिलापोटी ६३४ कोटी ४२ लाख ९१ हजार रुपये तर ३ हजार ९१७ पाणीपुरवठा योजनांकडे २१६ कोटी ८७ लाखांची थकबाकी आहे. पथदिवे आणि पाणीपुरवठा योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून चालविल्या जातात. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींनीही या दोन्ही योजनांची बिले थकविली आहेत.

शासकीय कार्यालयेही आघाडीवरवीजबिलांचा नियमित भरणा न करण्यात शासकीय कार्यालये देखील मागे नाहीत. तिन्ही जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये घेतलेल्या ५ हजार ६०६ वीज जोडण्यांपोटी ९ कोटी १६ लाख रुपयांची थकबाकी आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती थकबाकीहिंगोली : ४५९.८५नांदेड : १०५४.००परभणी : ८४५.३२(आकडे कोटीत)

टॅग्स :NandedनांदेडparabhaniपरभणीHingoliहिंगोली