नांदेड : शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वाटप हे खरीप पेरणीपूर्व करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार आता १५ जूनअखेरपर्यंत शेतकऱ्यांनी खरीप पेरणी पूर्वनियोजन कार्यक्रमांनुसार वाटपाची नोंद घेऊन संबंधित शाखेतून अनुदानाची रक्कम घेऊन जावी, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
३ मे रोजी पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारीची आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्वांची बैठक घेऊन गावांचा नियोजनबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. अनुदान शिल्लक राहिलेल्या संबंधित गावातील शेतकऱ्यांना अनुदान घेऊन जाण्यासाठी कळविण्यात आले आहे. १५ जूनअखेरपर्यंत रकमेचे वाटप होणार आहे.