शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
5
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
6
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
7
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
8
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
10
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
11
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
12
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
13
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
14
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
15
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
16
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
17
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
18
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
19
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
20
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका

मायलेकींना आमदार करणारा मतदारसंघ नांदेडात; आता भोकरमध्ये पुनरावृत्तीची श्रीजयाला संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 1:14 PM

नांदेड जिल्ह्यातून आतापर्यंत चार महिला उमेदवारांना विधानसभेत संधी मिळाली आहे.

नांदेड : माजी आमदार अमिता चव्हाण यांच्यानंतर चव्हाण दाम्पत्याची मुलगी श्रीजया चव्हाण यांना आमदार बनण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे अंजनाबाई जयवंत पाटील आणि त्यांची मुलगी यांची मुलगी सूर्यकांता पाटील या मायलेकींना आमदार करणाऱ्या नांदेड जिल्ह्यात ही पुनरावृत्ती होईल का, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यानिमित्ताने चव्हाण कुटुंबीयांची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यानंतर त्यांची मुलगी श्रीजया यंदा चव्हाण कुटुंबीयांचा पारंपरिक असलेल्या भोकर मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवत आहे. श्रीजयाचा विजय झाल्यास मायलेकींना आमदार करणारा भोकर हा नांदेड जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ ठरेल. यापूर्वी हदगाव मतदारसंघातून मायलेकींनी विधानसभेचे नेतृत्व केले होते. ‘मायलेकीला आमदार करणारा’ अशी हदगाव मतदारसंघाची यापूर्वी राज्यात ओळख होती. मायलेकींना आमदार बनवणारा बहुधा हा राज्यातील एकमेव मतदारसंघ असेल. त्याचीच पुनरावृत्ती २०२४ मध्ये होईल का? भोकर मतदारसंघातून मतदार पुन्हा मुलीला संधी देतील का? श्रीजयाचा विजय होईल का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. श्रीजयाचा विजय झाल्यास मायलेकींना आमदार करणारा भोकर हा दुसरा मतदारसंघ असेल.

नांदेड जिल्ह्यातून आतापर्यंत चार महिला उमेदवारांना विधानसभेत संधी मिळाली आहे. संयुक्त महाराष्ट्र असताना अंजनाबाई जयवंत पाटील यांनी जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार बनण्याचा बहुमान प्राप्त केला. संयुक्त महाराष्ट्रात १९५७ ते १९६२ या काळात अंजनाबाई या पहिल्या महिला आमदार बनल्या. मातब्बर नेते श्यामराव बोधनकर यांचा त्यांनी १९५७ मध्ये पराभव केला होता. श्रीजया निवडून आल्या तर महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पाचव्या महिला आमदार म्हणून नांदेड जिल्ह्यात त्यांची ओळख असेल.

सूर्यकांता पाटील यांनी केले प्रतिनिधित्वतब्बल १८ वर्षांनी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १९८० मध्ये अंजनाबाई यांची मुलगी सूर्यकांता पाटील या हदगावमधून निवडून आल्या. अत्यंत चुरशीच्या या लढतीत सूर्यकांता पाटील यांनी अवघ्या ५१७ मतांच्या फरकाने बापूराव पाटील शिंदे आष्टीकर यांचा पराभव केला.

श्रीजया पाचव्या आमदार बनतील का ?अंजनाबाई व सूर्यकांता या मायलेकींनंतर शिवसेनेच्या अनुसया खेडकर या २००४ मध्ये नांदेड उत्तरमधून निवडून आल्या होत्या. २०१४ मध्ये भोकर विधानसभा मतदारसंघात अमिता चव्हाण यांनी माजी राज्यमंत्री माधव किन्हाळकर यांचा पराभव केला होता. यंदा भोकरमधून श्रीजया चव्हाण उभ्या आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकhadgaon-acहदगांवbhokar-acभोकर