लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शेंदरी (बोंड) अळीच्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादनात एकरी ८ ते १० क्विंटलने घट झाली़ त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून नुकसान भरपाईसाठी लागणाºया कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची धांदल सुरू झाली आहे़ कर्जमाफी, पीक विमा, बँकेला आधार लिंक, पीककर्ज अन् आता शेंदरी अळीसाठी कागदपत्रे गोळा करावी लागत आहेत़ त्यामुळे यंदा शेतकºयांचे अख्खे वर्षच कागदपत्रे गोळा करण्यात गेले़ परंतु, आजपर्यंत शासनाकडून एक छदामही शेतकºयांच्या हाती आलेला नाही़नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांत खरीप हंगामामध्ये लागवड झालेल्या २ लाख ७० हजार हेक्टर कापसावर शेंदरी (बोंडअळी) अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे़ कृषी विभागाकडे आजपर्यंत बारा हजारांहून अधिक शेतकºयांनी लेखी तक्रारी केल्या आहेत़ त्यानुसार जवळपास अडीच लाख हेक्टरची कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाºयांनी पाहणी केली आहे, परंतु यानंतर नुकसान भरपाईचे निकष काय आणि आर्थिक मदत कधी मिळणार, याबाबत कोणाकडेच उत्तर नाही़ त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमावस्थेत सापडले आहेत़कापूस लागवड झाल्यानंतर तीन ते चार महिन्यापर्यंत शेंदरी बोंडअळीचे प्रमाण तुरळक प्रमाणात होते़ परंतु, मागील महिनाभरात बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ अचानक सर्वत्र बोंडअळीचे प्रमाण वाढले असून कपाशीला लागलेले पाते, फुले व बोंडे पूर्णत: नष्ट झाली आहेत़ बोंड लागले परंतु, बोंडामध्ये कापसाऐवजी पूर्ण अळ्याच दिसून येत आहेत़ त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी कापूस काढून टाकला तर काहींनी त्यात जनावरे सोडून दिली़ कापसाचे झाड हिरवे असूनसुद्धा बोंडे मात्र प्रादुभार्वामुळे किडकी निघत आहेत़काही प्रमाणात उगवण झालेला कापूस बोंडअळीच्या प्रादुर्भावाने वेचतासुद्धा येत नाही़ सदर अळ्यांमुळे अंग खाजत असून त्वचेचे आजार होतील या भीतीने कापूस वेचणीकडे मजूर महिलांनी पाठ फिरविली आहे़ एरव्ही सहा ते सात रूपये किलोप्रमाणे होणाºया वेचणीसाठी सात ते दहा रूपये प्रतिकिलोसाठी मजुरी मोजावी लागत आहे़जिल्ह्यातील १२ हजारांहून अधिक शेतकºयांनी कृषी विभागाकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. सदर अर्ज त्या - त्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे केलेले आहेत़ सदर अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवला जातो. यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून कपाशीच्या शेतीची पाहणी करून पंचनामे करून तो अहवाल संचालक गुण व नियंत्रण कृषी विभाग, पुणे यांच्याकडे पाठविण्यात येतो़नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मागील काळात सरकारने लाल्या रोग व सोयाबीनच्या लष्करी अळीच्या नुकसानग्रस्त शेतकºयांना सरसकट आर्थिक नुकसान भरपाई दिली होती. याच धर्तीवर राज्य सरकारने कापूस उत्पादक शेतकºयांना नुकसान भरपाई देवून दिलासा द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे़बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांचे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज स्वीकारत आहोत़ परंतु, भविष्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शेतकºयांनी डिसेंबरनंतर कापसाला पाणी न देता तो नष्ट करावा़ काढून टाकलेल्या पºहाट्या जाळून टाकाव्यात तसेच कापसात असलेल्या कोषातून पुन्हा अळीची उत्पत्ती होते़ त्यामुळे जिनिंगमध्ये लाईटट्रॅप्स लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ आजघडीला जिल्ह्यात सर्वत्र बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे पाहणीवरून लक्षात येत आहे़- डॉ. तुकाराम मोटे,जिल्हा कृषी अधीक्षककॉटन अॅक्ट-२००९ नुसार कपाशीला कीड, साथरोग, उगवणक्षमतेत झालेली घट आदींमुळे उत्पादनक्षमता घटल्यास संबंधित कंपनीने नुकसान भरपाई देणे अनिवार्य आहे़, परंतु यातही काही प्रमाणात आणि तुरळक ठिकाणी नुकसान झाले असेल तर तसा निर्णय कृषी विभाग घेत असते़ कपाशीचे बियाणे घेताना बीटी कंपन्याकडूनच घेण्याचा तगादा काही दुकानदार लावतात़ तर कंपन्यादेखील उत्पन्न आणि रोगमुक्त पिकाची हमी देतात़ याच आमिषाला बळी पडून ९५ टक्के शेतकरी बीटी बियाणे वापरतात़ बोंडअळीचा प्रादुर्भाव कापूस आणि भेंडीवर होत असतो. त्यामुळे बहुतांश बीटी बियाणे कापूस आणि भेंडीचे आहे.बियाणाच्या पावत्या नसल्याने अडचण बियाणे खरेदी करताना बºयाच शेतकºयांना साध्या पावत्या दिल्या आहेत़ तर बहुतांश शेतकºयांकडे असलेल्या पक्क्या पावत्या आणि बियाणाच्या बॅगला असलेले लेबल आता सापडत नसल्याने त्यांना अर्ज करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे़ पावतीचे काय काम पडणार म्हणून बहुतांश शेतकरी पावती, लेबल सांभाळून ठेवत नाही़ नोंदणीसाठी पावती अथवा लेबल, सातबारा होर्डिंग्ज, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आदीच्या झेरॉक्स लागत आहेत़सरसकट नुकसान भरपाई द्या-कृषी परिषद
नांदेड जिल्ह्यात शेतकºयांच्या स्वप्नावर नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:57 AM
नांदेड : शेंदरी (बोंड) अळीच्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादनात एकरी ८ ते १० क्विंटलने घट झाली़ त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून नुकसान भरपाईसाठी लागणाºया कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची धांदल सुरू झाली आहे़ कर्जमाफी, पीक विमा, बँकेला आधार लिंक, पीककर्ज अन् आता शेंदरी अळीसाठी कागदपत्रे गोळा करावी लागत आहेत़ त्यामुळे यंदा शेतकºयांचे अख्खे वर्षच कागदपत्रे गोळा करण्यात गेले़ परंतु, आजपर्यंत शासनाकडून एक छदामही शेतकºयांच्या हाती आलेला नाही़
ठळक मुद्देकापूस उत्पादनात मोठी घट : कृषी विभागाकडे बारा हजारांहून अधिक शेतकºयांच्या तक्रारी