शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

नाराज शिवसैनिकांचा हिंगोलीत तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 12:00 AM

लोकसभा निवडणुकीत भाजपाने आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांना दिलेल्या उमेदवारीवरुन शिवसेना पदाधिकाऱ्यांची असलेली नाराजी दूर करण्यात अद्यापही सेनेच्या नेत्यांना यश आलेले नाही.

ठळक मुद्देसंपर्कप्रमुखांची मध्यस्थी निष्फळदिलजमाईच्या बाणाचा नेम चुकला

शिवराज बिचेवार।नांदेड : लोकसभा निवडणुकीत भाजपाने आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांना दिलेल्या उमेदवारीवरुन शिवसेना पदाधिकाऱ्यांची असलेली नाराजी दूर करण्यात अद्यापही सेनेच्या नेत्यांना यश आलेले नाही. दोन दिवसांपूर्वी नाराजांच्या दिलजमाईसाठी माजी आख़ेडकर यांच्या निवासस्थानी संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी बैठकही घेतली होती़ परंतु, त्या बैठकीनंतरही नाराज शिवसेना पदाधिकारी नांदेडात प्रचारात सक्रिय न होता हिंगोली मतदारसंघात फिरत आहेत़ त्यामुळे संपर्कप्रमुखांनी दिलजमाईसाठी चालविलेल्या बाणाचा नेम चुकल्याचे म्हटले जात आहे़महापालिका निवडणुकीत सेनेचे आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपाच्या व्यासपीठावरुन सेना पदाधिकाऱ्यांच्या विरोधात शब्दबाण चालविले होते़ त्यावेळी चिखलीकरांनी आपला ‘प्रताप’ दाखवित सेनेच्या जिल्हाप्रमुखासह अनेकांना फोडत भाजपाच्या तंबूत आणले होते़ चिखलीकरांच्या या फोडाफोडीच्या राजकारणामुळे मनपात दोन्ही पक्षांना याचा फटका बसला़ परंतु, चिखलीकरांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील सेना पदाधिकाऱ्यांच्या मनावर मात्र खोलवर जखम झाली़त्यात भाजपाने लोकसभेसाठी चिखलीकर यांच्या नावाची घोषणा करताच सेना पदाधिकाºयांनी यास विरोध करण्यास सुरुवात केली़ सेना पदाधिका-यांनी त्यापूर्वीच उमेदवार घोषित करताना भाजपाने आम्हाला विश्वासात घ्यावे, अन्यथा गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला होता़ परंतु या इशाºयाकडे भाजपाने कानाडोळा केला़त्यानंतर शहरप्रमुख पप्पू जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सेना पदाधिकारी चिखलीकरांचा प्रचार करणार नसल्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला़ त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली होती़ त्यानंतर दिलजमाईसाठी दोन दिवसांपूर्वी सेनेचे दिवंगत माजी आ़ प्रकाश खेडकर यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील शिवसैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीत सेना पदाधिका-यांनी संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्यासमोर चिखलीकरांच्या प्रतापाचा पाढा वाचला़ परंतु संपर्कप्रमुखांनी मात्र मातोश्रीवरुन आदेश आल्यामुळे आपल्या सर्वांना एकदिलाने कामाला लागावे लागेल असे आवाहन केले़या बैठकीला चिखलीकरांचीही उपस्थिती होती़ त्यानंतर नाराज सेना पदाधिकारी नांदेडात प्रचारासाठी सक्रिय होतील असा अंदाज बांधण्यात येत होता़ परंतु, नाराजांनी यामध्ये मध्यममार्ग काढत हिंगोली लोकसभा मतदारसंघात हेमंत पाटील यांच्या प्रचारास सुरुवात केली आहे़ दररोज नांदेडचे सेना पदाधिकारी पहाटेच हिंगोलीकडे रवाना होत आहेत़ त्यामुळे संपर्कप्रमुखांनी दिलजमाईसाठी केलेला प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसून येत आहे़झालं गेलं गंगेला मिळालं-चिखलीकरमहापालिका निवडणुकीत जे झालं गेलं ते गंगेला मिळालं त्यावेळी दोन्ही पक्षांची युती नव्हती़ आता युती झाली आहे़ त्यामुळे शिवसैनिक एकदिलाने काम करुन महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास मला आहे़ अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली़

टॅग्स :nanded-pcनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा