पॅनलप्रमुख ईश्वर पाटील-इंगोले यांच्या युवाशक्ती ग्राम विकास पॅनलचे नऊ उमेदवार निवडून आले होते; तर माजी उपसभापती डॉ. लक्ष्मण इंगोले यांच्या पॅनलला चार जागा मिळाल्या होत्या. शुक्रवारी (दि. १२) सरपंच-उपसरपंच पदाची निवडणूक झाली. त्यात सरपंच पदासाठी अनिल इंगोले आणि उपसरपंच पदासाठी मनोहर खंदारे यांनी नामांकन दाखल केले; त्यात दोघांनाही नऊ मते मिळाली. या निवडणुकीत डॉ. लक्ष्मण इंगोले यांना सरपंचपदासाठी चार, तर उपसरपंचपदासाठी मारोती बुट्टे यांना चार मते मिळाली. या निवडणुकीत संगीता कोल्हे आणि सविता नागोराव इंगोले या दोन सदस्यांनी मतदान केले नाही. सरपंच म्हणून अनिल बाबूराव इंगोले, तर उपसरपंच म्हणून मनोहर रखमाजी खंदारे यांची निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मुंडकर यांनी काम पाहिले. निवडीनंतर सरपंच, उपसरपंच व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रंगराव इंगोले, केशवराव इंगोले, भागवत इंगोले, सतीश कुलकर्णी, बालाजी मरकुंदे, शरद जोशी, एकनाथ पाटील, पॅनलप्रमुख ईश्वर पाटील, बळवंत इंगोले, प्रल्हाद इंगोले, शिवाजी इंगोले, साहेबराव इंगोले, गजानन तिम्मेवार, पवन पाटील, तुषार जीवनाजी वाघमारे, सोनाली धनंजय सावंत, सुवर्णमाला केशव हनुमंते, सोनाली स्वप्निल इंगोले, मंगेश सदाशिव बुट्टे, प्रभावती दुर्गादास चौरे, माधव काशिनाथ स्वामी, आदी सदस्य उपस्थित होते.