कंधार (नांदेड ) : गुराखी गडावरील २७ व्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या विविध कलांच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
गुराखीगडावर २७ वे जागतिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी कलावंतांनी आपले मौखिक साहित्य, कला, गीत, गवळण, भजन, रान शिवारातील गीते, जात्यावरील गीते, भुलई, , मनकवडे, गोंधळी, देवीचा जागर आदीचे सादरीकरण करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर विद्यार्थ्यांनी लोककला, लोकगीते, आदिवासी नृत्य, शेतकरी गीते, लावणी, पोवाडे आदी कलाप्रकारांचे सादरीकरण केले. यात कंधार, कुरूळा, दिग्रस, लोहा, सोनखेड, बारूळ, हाळदा,नांदेड, औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पहा व्हिडीओ :