शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी २८२ कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 6:49 PM

नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपये प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्दे शासनाने नुकसानीपोटी ६ हजार रुपये प्रतिहेक्टर ऐवजी १० हजार रुपये प्रतिहेक्टर मदत देण्याचा निर्णय घेतला.जिल्ह्याची एकूण मागणी आता ५६५कोटी १३ लाख ३६हजार ३५० रुपये इतकी झाली आहे.

नांदेड : अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात ५ लाख ६४ हजार ५१९ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण नुकसान पाहता २८२ कोटी ५६ लाख ६९ हजार ३५० रुपयांची गरज आहे. 

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पूरपरिस्थिती यामुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत दिली जाईल असे शासनाने घोषित केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत वितरीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात जिरायत पिकांचे ५ लाख ६३ हजार ४०९ हेक्टर क्षेत्रातील, बागायत ७०० हेक्टर आणि फळ पिकांचे ४०९.४५ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले होते. सर्वाधिक फटका हा हदगाव तालुक्याला बसला होता. हदगाव तालुक्यात ६५ हजार ६२१ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके बाधित झाली होती. त्या खालोखाल लोहा तालुक्यात ५२ हजार ३२६ हेक्टर क्षेत्रात, किनवट तालुक्यात ४८हजार ४७२, देगलूर तालुक्यात ४४ हजार ८२९, मुखेड तालुक्यात ४८ हजार ७९५ हेक्टर तसेच इतर तालुक्यात एकूण ५ लाख ६४ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले होते. 

या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपये प्राप्त झाले आहे. यामध्ये नांदेड तालुक्याला १० कोटी ३३ लाख ४४ हजार रुपये, अर्धापूर ८ कोटी ५१ लाख ४ हजार रुपये, कंधार २० कोटी ७६ लाख ७९ हजार रुपये, लोहा २६ कोटी ३६ लाख १७ हजार रुपये, बिलोली १६ कोटी २० लाख ८९ हजार रुपये, नायगाव १९ कोटी १९लाख ६४ हजार रुपये, देगलूर २२ कोटी ४१ लाख ४४हजार रुपये, मुखेड २४ कोटी ४० लाख ६४ हजार रुपये, भोकर १९ कोटी ५७ लाख ६७ हजार रुपये, मुदखेड ७ कोटी २९ लाख ८४ हजार रुपये, धर्माबाद १० कोटी २३ लाख ५९ हजार रुपये, उमरी १४ कोटी ३७ लाख ६७ हजार रुपये, हदगाव ३२ कोटी ८१ लाख ४ हजार रुपये, हिमायतनगर १५ कोटी ९९लाख२९हजार रुपये, किनवट २४ कोटी २३ लाख ६३ हजार रुपये आणि माहूर तालुक्याला ९ कोटी ८३ लाख ७७ हजार रुपये मदतीपोटी पहिल्या टप्प्यात मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आता बँकेकडे लागल्या आहेत. पैसे जमा होण्याची प्रतीक्षा आहे.

१८० कोटींची मागणी वाढलीजिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मदतीसाठी प्रचलित शासन निर्णयानुसार शासनाकडे ३८४ कोटी ८० लाख १२ हजार रुपयांची मागणी केली होती. शासनाने नुकसानीपोटी ६ हजार रुपये प्रतिहेक्टर ऐवजी १० हजार रुपये प्रतिहेक्टर मदत देण्याचा निर्णय घेतला. बागायत व फळपिकांसाठीही मदत वाढवून देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याची मागणी आता १८०कोटींनी वाढली आहे. पहिल्या टप्प्यात ५०टक्के रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. जिल्ह्याची एकूण मागणी आता ५६५कोटी १३ लाख ३६हजार ३५० रुपये इतकी झाली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडagricultureशेती