नांदेड : केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने वास्तवात सामान्यांसाठी काहीच केले नाही. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून त्यांनी खोटा प्रचार सुरु केला आहे. या त्यांच्या प्रचाराला महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चोख प्रत्यत्तर द्यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सूचनेवरुन व आ़ अमिताताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहर व जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यातील महिला पदाधिका-यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे़ या शिबिराच्या समारोपप्रसंगी खा़ चव्हाण बोलत होते़ मंचावर आ.डी.पी.सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, महापौर शीला भवरे, महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता धोंडे, स्मिता शहापूरकर, शिल्पा बोडखे, मनीषा रोडे, प्रशिक्षक इरफान खान, मनीष तिवारी, किशोर स्वामी, किशोर भवरे यांची उपस्थिती होती़यावेळी खा. चव्हाण म्हणाले, महिला पदाधिका-यांनी राजकीय अभ्यास वाढवून लोकांपुढे वस्तुस्थिती मांडली पाहिजे. दररोजच्या वर्तमानपत्र वाचनातून राजकीय जागरुकता तयार केली पाहिजे. आपल्या हाती असलेल्या मोबाईलचा व्हॉटसअप, फेसबुक, टिष्ट्वटर या समाजमाध्यमांतून काँग्रेसचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले पाहिजे.२०१४ पूर्वी व त्यानंतर मोदींनी केलेली भाषणे व त्यात त्यांनी घेतलेला यू-टर्न देशासाठी किती घातक आहे, हे सांगण्याची आता वेळ आली आहे.‘अब की बार, मोदी सरकार’ हे जरी भाजपवाले भिंती रंगवून आपल्या मनावर बिंबविण्याचा प्रकार करीत असले तरी जनता मात्र ‘अब की बार, बस कर यार’ असे म्हणत आहे. प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे. प्रचारासाठी त्यांनी महाराष्ट्रात यावे याचा आपण प्रयत्न करत आहोत असेही ते म्हणाले़तत्पूर्वी सकाळच्या सत्रात आ.अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रंजना सावंत, मृणाल राजूरकर, मंगलाताई निमकर, सुमती व्याहाळकर, अनिता इंगोले, मंगलाताई धुळेकर, कविताताई कळसकर, अनुजाताई तेहरा, सौ.शैलजा स्वामी, प्रा. डॉ. कविता सोनकांबळे यांची उपस्थिती होती़निमंत्रित पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी आज शिबीरमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरुन संपूर्ण राज्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याचा नवा उपक्रम हाती घेण्यात आला असून याच अनुषंगाने उद्या ६ फेब्रुवारी रोजी येथील आशीर्वाद गार्डनमध्ये निमंत्रित पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर व जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी आज येथे दिली. उद्घाटन सोहळ्यास सहप्रभारी माजी आ.संपतकुमार, आ.डी.पी.सावंत, आ.अमिताताई चव्हाण, आ.वसंतराव चव्हाण, जि.प.अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर, महापौर शीलाताई भवरे आदींची उपस्थिती राहणार आहे.
सरकारच्या खोट्या प्रचाराला प्रत्युत्तर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:37 AM
केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने वास्तवात सामान्यांसाठी काहीच केले नाही. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून त्यांनी खोटा प्रचार सुरु केला आहे. या त्यांच्या प्रचाराला महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चोख प्रत्यत्तर द्यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
ठळक मुद्देखा़ अशोकराव चव्हाण यांचे आवाहनमहिला प्रशिक्षण शिबीर