नायगांव : कृष्णूर येथील मेगा इंडीया अॅग्रो अनाज कंपनी धान्य घोटाळा प्रकरणात नायगाव न्यायालयात ६० दिवसात दोषारोपपत्र दाखल केले नाही म्हणून अजय बाहेती, जयप्रकाश तापडीया, राजू पारसेवार आणि ललितराज खुराणा यांनी मागितलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला.न्या़सय्यद वहाब यांनी या प्रकरणात ९० दिवसांपर्यंत दोषारोपपत्र दाखल करता येते अशी नोंद केली आहे़ या प्रकरणात या चौघांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असून त्यावर १८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.कृष्णूर धान्य घोटाळा प्रकरणात दहा ट्रक चालकांना पकडण्यात आले होते़ त्यानंतर हा तपास पोलिसांकडून सीआयडीकडे देण्यात आला़ मध्यंतरी न्यायालयाने सीआयडीच्या तपासावर सुनविले होते़ त्यानंतर लगेच या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे़ त्यात इंडिया मेगा अ?ॅग्रो अनाज कंपनीचे मालक अजय बाहेती, व्यवस्थापक जयप्रकाश तापडीया, सरकारी धान्याचे वाहतूक कंत्राटदार राजू पारसेवार आणि ललितराज खुराणा या चौघांना १० मे २०१९ रोजी अटक केली होती. सध्या हे चारही जण आणि सोबत महसूल विभागाचे चार कर्मचारी हर्सूल कारागृहात आहेत.दोन दिवसापूर्वी नायगाव न्यायालयात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ६० दिवसात दोषारोपपत्र दाखल केले नाही म्हणून जामीन मिळावा असा अर्ज करण्यात आला. या दरम्यान उच्च न्यायालयात सुध्दा या चौघांच्या वतीने नियमित जामीन मिळावा असा अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्याची सुनावणी ९ जुलै रोजी होती आता ती १८ जुलै २०१९ रोजी होणार आहे.सरकार पक्षाच्या वतीने अॅड.भोसले यांनी १३ वरिष्ठ न्यायालयाचे निवाडे सादर करुन या प्रकरणातील दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांचा अवधी आहे, हा मुद्दा मांडला होता़ त्यानंतर न्यायालयाने अर्ज फेटाळला़
चारही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:31 AM
कृष्णूर येथील मेगा इंडीया अॅग्रो अनाज कंपनी धान्य घोटाळा प्रकरणात नायगाव न्यायालयात ६० दिवसात दोषारोपपत्र दाखल केले नाही म्हणून अजय बाहेती, जयप्रकाश तापडीया, राजू पारसेवार आणि ललितराज खुराणा यांनी मागितलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
ठळक मुद्देधान्य घोटाळा : नायगांव न्यायालयाचा निर्णय