शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रॅगिंगच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 7:42 PM

नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकरण 

ठळक मुद्देविधानसभा अध्यक्षांचे मंत्र्यांना आदेशरॅगिंगचा गंभीर प्रकार लोकमतने उघडकीस आणला.

- शिवराज बिचेवानांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयातील वसतिगृहात वरिष्ठ विद्यार्थिनींकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींची रॅगिंग करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार लोकमतने उघडकीस आणला.   याचे पडसाद गुरुवारी सर्वस्तरावर उमटले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी  महाविद्यालय प्रशासनाने तातडीने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. तर विधानसभेत  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. अखेर सभापती नाना पटोले यांनी  याबाबत माहिती घेऊन निवेदन सादर करण्यास संबंधित विभागाच्या मंत्र्यांना आदेशित केले.

मुलींच्या वसतिगृहात गेल्या चार दिवसांपासून रॅगिंगचा प्रकार सुरु आहे़  हा प्रकार लोकमतने  उघडकीस आणला़ बुधवारी रात्री प्रभारी अधिष्ठाता डॉ़ एस़आऱ वाकोडे, डॉ़ गोडबोले, डॉ़ मुकुंद कुलकर्णी, वॉर्डन सुधा कानखेडकर यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींकडे विचारपूस केली होती़ रात्री सात वाजेपर्यंत ही चौकशी सुरु होती़ परंतु चौकशीसाठी जाण्यापूर्वीच सिनिअर विद्यार्थिंनींनी पुन्हा या विद्यार्थिनींना दम भरला. आमची तक्रार केल्यास बघा, पाच वर्ष आमच्या सोबतच राहायचे आहे. अशी धमकी  देण्यात आली होती़ शैक्षणिक नुकसान होण्याच्या भीतिने एकाही मुलीने तक्रार दिली नाही़ गुरुवारी सकाळपासून महाविद्यालय प्रशासन तणावात होते़ त्यात संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांनीही दूरध्वनीवरुन सकाळीच झाडाझडती घेतली़ प्रभारी अधिष्ठाता डॉ़ वाकोडे यांनी तात्काळ सर्व प्राध्यापकांना बोलावून बैठक घेतली़ या बैठकीत चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला़ या समितीत डॉ़ इशरत करीम, डॉ़ सुधा करडखेडकर आणि डॉ़ एस़ए़ देशपांडे यांचा समावेश आहे़ चौकशीसाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींना पाचारण करण्यात आले होते़ याचवेळी नांदेड ग्रामीणचे पोनि़ पंडित कच्छवे यांनीही निनावी तक्रार देण्याचे आवाहन विद्यार्थिनींना केले.

‘लोकमत’च्या वृत्ताचे विधानसभेत पडसादच्विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘लोकमत’च्या या वृत्ताकडे विधानसभेचे लक्ष वेधले. ते म्हणाले, नांदेडच्या डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुंबईतील पायल तडवीसारखे प्रकरण घडले आहे. ही गंभीर बाब असून अशा गोष्टींवर वेळीच आळा घातला नाही तर, पायल तडवीसारखी अनेक प्रकरणे होतील़ त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन याबाबतची माहिती सभागृहात सादर करुन कारवाई करावी अशी मागणी केली़  च्यावर रॅगिंगचा विषय गंभीर आहे़  त्यामुळे  सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा तसेच संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन  सभागृहासमोर निवेदन करावे अशा सुचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या़

न घाबरता तक्रारीसाठी पुढे याबुधवारी रात्री मुलींची विचारपूस करण्यात आली; परंतु प्रथम वर्षातील मुलींनी याबाबत काहीही सांगितले नाही. अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. चौकशीत कुणी दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. विद्यार्थिनींनी न घाबरता तक्रारीसाठी पुढे यावे़ फोनवर किंवा निनावी तक्रार करावी असे आवाहन प्रभारी अधिष्ठाता डॉ़ एस़आऱ वाकोडे यांनी केले.  

मी जसे बोलले, तू ही तसेच बोलमहाविद्यालय परिसरात प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींची समितीकडून चौकशी सुरु असताना मी जसे बोलले,, तू ही तसेच बोल, काय झालं, हे सांगण्याच्या भानगडीत पडू नको, असा सल्ला समितीच्या चौकशीनंतर बाहेर आलेल्या एका विद्यार्थिनीने आपल्या मैत्रिणीला दिला़ यावरुन विद्यार्थिनी किती तणावात आहेत हे स्पष्ट होते़  

टॅग्स :collegeमहाविद्यालयMedicalवैद्यकीयNandedनांदेड