आठवी व्याख्यानमाला
नांदेड - अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स आयोजित अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, पौर्णिमानगर येथे आठव्या व्याख्यानमालेत इंजि. माणिकराव गिरगावकर यांचे व्याख्यान पार पडले. अध्यक्षस्थानी पी. बी. कोलंबीकर तर उद्घाटक म्हणून धनजकर गुरुजी यांची उपस्थिती हाेती. सूत्रसंचालन प्रभाकर ढवळे यांनी तर बा. रा. वाघमारे यांनी आभार मानले.
सचखंड दुपारी धावणार
नांदेड - दमरेच्या नांदेड विभागातून २८ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सुटणारी गाडी संख्या ०२७१५ नांदेड ते अमृतसर विशेष एक्स्प्रेस हुजुर साहिब नांदेड येथून दुपारी १२ वाजता सुटेल. सदर गाडी तिच्या नियमित वेळेच्या १५० मिनिटे उशिराने धावणार आहे. या सचखंड एक्स्प्रेसचा येणारा रेक १२ तास उशिराने धावत आहे. त्यामुळे नांदेडमधून सोडण्यात येणारी गाडी दुपारी १२ वाजता सोडण्यात येणार आहे.
पुस्तकाचे प्रकाशन
नांदेड - तंबाखूमुक्त अभियानासाठी आवश्यक असलेल्या तंबाखूमुक्त शाळा आरोग्यदायी जीवन महाराष्ट्र राज्य या पुस्तकाचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे, अधीक्षक येरपूरवार, राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रम जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. साईप्रसाद शिंदे, जिल्हा समन्वयक रवी ढगे उपस्थित होते.