नांदेड : गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांची ओरड होत असून आता महापालिकेच्या स्थायी समितीने ४६ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंजुरी दिली आहे़ त्यामुळे खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नांदेडकरांना या निर्णयामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे़शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची चाळणी झाली आहे़ खड्डा नसलेला एकही रस्ता दिसून येत नाही़ मुख्य चौकातही खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते़ त्यात अनेकांना खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार झाले आहेत़ परंतु खड्डे बुजविण्यासाठी मनपाकडेही निधी नसल्याची ओरड होत होती़ त्यात शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील ४६ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे़ यामध्ये रेल्वेस्टेशन ते वजिराबाद पोलीस चौकी-गुरुद्वारा गेट क्रमांक १ ते वेळी मार्केट-बर्की चौक रस्ता क्रमांक १ ते ४, मुथा चौक ते जुना मोंढा टॉवर-बर्की चौक ते देगलूर नाका, गुरुद्वारा परिक्रमा-२, गांधी पुतळा ते महावीर चौक, वजिराबाद रोड ते बंदाघाट, सावरीकर बिल्डींग ते नावघाट, देगलूर रोड ते केळी मार्केट, सिडको-हडको भागातील मुख्य डांबरी रस्ते दुरुस्त करणे, छत्रपती चौक ते रेस्ट हाऊस, शिवाजी पुतळा ते देगलूर रोड, भाग्यनगर टी पॉर्इंट ते व्हीआयपी रोड-रेल्वेस्टेशन, हिंगोली गेट ते एमजीएम कॉलेज, डीएड कॉलेज रोड, फुले मार्केट ते पावडेवाडी नाका, औद्योगिक वसाहत रस्ते, बाबानगर एसटीडी ते रुपा गेस्ट हाऊस, शिवाजीनगर ते डॉक्टर लाईन- लालवाडी, हिंगोली गेट स्लीप रोड आणि दक्षिण उत्तर, देगलूर रोड ते चौफाळा, अॅक्सीस बँक ते खडकपूरा, आय़जी़आॅफीस ते लातूर रोड, चुना भट्टी रस्ता, दरबार मस्जीद ते नावघाट, वर्कशॉप ते मुथा चौक, मुथा चौक ते गोवर्धन घाट ब्रिज-लातूर रोड, गुरुद्वारा परिसरातील सर्व रस्ते, हिंगोली गेट ते चिखलवाडी चौक, रस्ता क्रमांक २४ ग्यानमाता शाळा ते देगलूर रोड, भगतसिंग रोड ते बाफना ते नवीन पूल, लातूर रोड ते दूधडेअरी, विमानतळ सांगवी ते छत्रपती चौक, शिवाजीनगर ते नसरतपूर, वर्कशॉप टी पॉर्इंट ते नागार्जुना हॉटेल, व्हीआयपी रोड, आनंदनगर चौक ते महादेव दाल मिल, गोकुळनगर चौक ते एमएसईबी आॅफीस, मालेगाव रोड, दीपनगर पाटी ते ज्ञानेश्वरनगर, ज्योती टॉकीज रोड, महाराणा प्रताप चौक ते बाफना, रेल्वेस्टेशन ते देगलूर नाका, दबकपूल ते संगत साहिब गुरुद्वारा, लातूर रोड पोलीस चौकी ते रविनगर चौक, गांधी विद्यालय ते बडी दर्गाह, सराफा रस्ता ते नगरेश्वर मंदिर व मुनवरा मस्जीद ते अमिन कच्ची या रस्त्यांचा समावेश आहे़ या रस्त्यांसाठी जवळपास पाच कोटी रुपये खर्च लागणार आहे़
नांदेड शहरातील ४६ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 12:35 AM
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांची ओरड होत असून आता महापालिकेच्या स्थायी समितीने ४६ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंजुरी दिली आहे़
ठळक मुद्देस्थायी समितीचा निर्णय : पाच कोटींचा येणार खर्च