शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

वनरक्षकाच्या मध्यावधी बदलीसाठीही वनमंत्र्यांचीच मंजुरी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 4:42 PM

Forest Department Transfers : वनरक्षक व वनपाल यांनी आपल्या बदलीविराेधात मॅटमध्ये हे प्रकरण दाखल केले हाेते.

ठळक मुद्देएकाच ठिकाणी ६ वर्षे सेवेचा निकषदहा पसंतीक्रमांमध्येच हवी बदली

नांदेड : वनरक्षक हे वर्ग-३ चे पद असल्याने त्याला एका ठिकाणी ६ वर्षे राहता येते. तरीही संयुक्तिक कारण देऊन त्याची मध्यावधी बदली करायची असेल, तर त्यासाठी थेट वनमंत्र्यांची परवानगी असणे गरजेचे आहे, असा निर्वाळा मुंबई मॅटचे न्यायिक सदस्य ए. पी. कुऱ्हेकर यांनी १० ऑगस्ट राेजी दिला आहे.

वनरक्षक राजेंद्र सुरेश पाटील, सचिन आप्पासाहेब पाटील व वनपाल शकिल मुजावर यांनी आपल्या बदलीविराेधात मॅटमध्ये हे प्रकरण दाखल केले हाेते. ते तिघेही सांगली जिल्ह्यात कार्यरत आहेत. काेल्हापूरच्या मुख्य वन संरक्षकांनी ३ ऑगस्ट २०२० राेजी त्यांच्या बदल्या केल्या. मात्र ते बदलीस पात्रच नसल्याचे आढळून आले. सरकारी पक्षातर्फे ए. जे. चाैगुले यांनी ते बदलीस पात्र आहेत, मुख्य वनसंरक्षक हे मध्यावधी व सामान्य बदल्या करण्यास सक्षम ॲथॉरिटी असल्याचा युक्तिवाद केला. मात्र मॅटने ताे फेटाळून लावला. हे कर्मचारी बदलीस पात्र नसल्याची बाब नागरी सेवा मंडळाच्याही निदर्शनास कशी आली नाही, असा मुद्दा उपस्थित केला गेला. त्यांच्या बदल्या करताना तेवढे महत्त्वाचे कारण व मंत्र्यांची मंजुरी नसल्याच्या मुद्द्याकडे ॲड. भूषण अरविंद बांदिवडेकर यांनी लक्ष वेधले. अखेर त्यांचा युक्तिवाद मान्य करीत मॅटने तीनही याचिकाकर्त्यांच्या बदल्या रद्द करून त्यांना दाेन आठवड्यात पूर्व पदावर नियुक्त करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. गायत्री गाैरव बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.

हेही वाचा - राज्यभरात महिला पोलीस अंमलदारांना आठ तासांचीच ड्युटी ?

मग पर्याय विचारता कशाला ?वर्ग-२, ३ व ४ च्या कर्मचाऱ्याची बदली करायची असेल, तर त्याला दहा पसंती पर्याय विचारले जातात. या पर्यायांपैकीच एका ठिकाणी बदली करणे बंधनकारक आहे. परंतु जागा रिक्त असतानासुद्धा हे पर्याय साेडून बदली केली जाते. तसे असेल, तर पर्याय विचारताच कशाला ? असा सवाल मॅटने उपस्थित केला.

वेगळ्याच न्यायालयांमध्ये येरझाराबदली झाल्यानंतर उपराेक्त वनरक्षक, वनपालांनी आधी कामगार न्यायालयात धाव घेतली. तेथे स्थगनादेशही मिळाला. मात्र प्रकरण या न्यायालयात चालू शकत नसल्याची बाब दोन महिन्यानंतर लक्षात आल्याने, मग ते उच्च न्यायालयात गेले. परंतु उच्च न्यायालयाने त्यांना ‘मॅट’मध्ये जाण्याचा सल्ला दिला. अखेर नाेव्हेंबरमध्ये त्यांनी मॅटमध्ये प्रकरण दाखल केले.

टॅग्स :forest departmentवनविभागNandedनांदेडTransferबदली