कापूस खरेदी सुरू
भोकर : भोकर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कापूस खरेदी सुरू झाली आहे. बाजार समितीकडे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली अशांचा कापूस खरेदी केला जात आहे. ज्यांनी नोंदणी केली, अशा शेतकऱ्यांना मोबाइलवर एसएमएस पाठवला जात आहे.
महापरिनिर्वाण दिन
मुदखेड : शहरातील भीम अनुयायी व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी रत्नाकर तारू, शेटिबा झगडे, प्रवीण गायकवाड, पप्पू सोनटक्के, दिनेश शेटे, डी. जी. चौदंते, एकनाथ तारू, नागोराव लोखंडे, नारायण चौदंते, संजय कोलते, पांडुरंग चौदंते, बाळासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे आंदोलन
कंधार : शेतकरीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ सोमवारी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. आंदोलनात रामचंद्र येईलवाड, बाबूराव केंद्रे, मोहनराव पाटील, बापूराव गोंड, किशनराव डांगे, राजू पांगरेकर, प्रभाकर भातमोडे, राजेश्वर पाटील, ज्ञानेश्वर झंपलवाड, किशनराव बोमले, बळवंत भोसीकर, महंमद तन्वरोद्दीन, शेख महबूब आदी उपस्थित होते.
नरसी उपकेंद्राची दुरवस्था
नरसी : येथील प्राथिमक उपकेंद्राची दयनीय अवस्था झाली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली मागील एक वर्षापासून रुग्णालय बंद आहे. जे काम करण्यात आले ते निकृष्ट झाल्याचा आरोप आहे. ३० हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरात खाजगी रुग्णालये मोठ्या प्रमाणात असल्याने उपकेंद्राकडे कोणी फिरकत नाही. मधल्या काळात काही निधी उपलब्ध झाला होता. मात्र, संबंधितांनी थातूरमातूर काम केले. आजही बरीच कामे प्रलंबित आहेत.
कामाची संथगती
हदगाव : तालुक्यातील राजवाडी फाटा ते गवतवाडी या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. बऱ्याच दिवसांनंतर या कामाला प्रारंभ झाला. मात्र, अल्पावधीतच रस्त्याला ग्रहण लागले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने तर सोडा, चालणेही कठीण आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.
बाबासाहेबांना अभिवादन
हिमायतनगर : कारला येथील बुद्ध विहारात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामस्थांनी अभिवादन केले. कार्यक्रमाला सरपंच सत्वशीला धोंडगे, गोपीनाथ लुमदे, डॉ. गफार, संजय गोखले, जीवन रावते, ओम मोरे, नागसेन गोखले, गौतम कांबळे, अमोल गोखले, संदीप वाघमारे, भारत कांबळे आदी उपस्थित होते.
पेरण्या रखडल्या
अर्धापूर : तालुक्यातील बोरगडवाडी येथील दोन डीपी गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वी जळाल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली. याशिवाय विजेअभावी पेरण्याही रखडल्या आहेत. वारंवार तक्रारी करूनही महाविरतण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
मुगावे यांचा सत्कार
कंधार : पंचायत समितीचे लेखाधिकारी गणेश मुगावे यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ध्वजदिन निधी संकलनात मुगावे यांनी विशेष मोहीम राबविली होती. त्याबद्दल हा गौरव करण्यात आला.