शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

पोलिसांची गाडी दारात असताना डॉक्टरच्या घरात सशस्त्र दरोडा; हदगावमधील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 15:58 IST

डॉक्टरांसह कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण, लहान बाळाला उचलून नेण्याची धमकी, ५० तोळे सोने लंपास

हदगाव/ मनाठा : हदगाव शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात डॉक्टरांच्या घरी काल (दि.१६) रोजी रात्री धाडसी चोरी झाली. हातपाय बांधून बेदम मारहाण करीत चाकू गळ्याला लावला. याचबरोबर सहा महिन्यांच्या बाळाला उचलून नेण्याची धमकी देऊन घरातील ५० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना घडत असताना पोलिसांची गाडी दारात होती अन् चोर घरात असताना कोणालाही ओरड करता आली नाही.

हदगाचे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. पवन शेट्टी (३१)यांचे घर जुन्या शहरात आहे. १६ जुलै रोजी मध्यरात्री २.३० वाजता चोर मागच्या दाराने आत शिरले व बाहेर ओसरीत डॉक्टरांचे आई-वडील प्रमोद शेट्टी (५८) व प्रतिभा शेट्टी झोपले होते. त्यांना उठवून चोरांनी दागिने, पैसे कुठे आहेत याची विचारपूस केली; पण प्रतिभाबाईने सांगण्यास विरोध केल्याने त्यांना मारझोड केली. त्यानंतर डॉक्टरच्या खोलीत प्रवेश केला. त्यांच्या सहा महिन्यांच्या बाळाला सोबत घेऊन जाऊ, अशी धमकी दिल्याने त्यांनी कुठे काय आहे ते सांगितले. यावेळी पोलिसांची गाडी पेट्रोलिंगसाठी दारात उभी होती, पण बांधून सगळ्यांच्या मानेवर चाकू असल्यामुळे कोणालाही ओरडता येत नव्हते. हा खेळ पाऊण तास चालला.

याच घरात ३० वर्षांपूर्वी झाली होती चोरीयापूर्वी ३० वर्षांपूर्वी याच घरात अशीच मोठी चोरी झाली होती, अशी आठवण आजोबा यादव आप्पा यांनी सांगितली. ते चोर सालदार गडीच निघाले होते. या घटनेने शहरात भीती पसरली आहे. दरम्यान, सोन्याच्या बांगड्या, मणी मंगळसूत्रासह तिजोरीमधील सोन्याचे बिस्कीट असे ५० तोळे सोने व दीड लाख रोख रक्कम लंपास केली आहे. चोरांनी त्यांच्या अंगावरील कपडे घटनास्थळी टाकून डॉक्टरांचे कपडे घालून पोबारा केला.

मोटारसायकलवर आले चोरटेचोरी करण्यासाठी आणलेल्या मोटरसायकल अण्णाभाऊ साठे चौकात उभ्या करून ठेवल्या होत्या. तेथील नवयुवकांनी सदर माहिती पोलिसांना दिली व त्यांच्या स्वाधीन दोन मोटरसायकली केल्या; मात्र पळून जाताना परत हदगाव येथील बालाजी व्यास यांची मोटरसायकल चोरी करून ती मोटरसायकल कोथळा शिवारात कॅनॉलसाईडवर फेकून दिल्याचे आढळले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. पुढील तपासासाठी नांदेड येथील श्वानपथकासह एलसीबीचे अधिकारी तथा हदगाव येथील पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडRobberyचोरीPoliceपोलिस