नांदेड : शहरातील अशोकनगर येथे घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील रोख रक्कमेसह ३ लाख ८ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १ जुलैच्या रात्री घडली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशोकनगर येथील प्रयाग ४५ या इमारतीत राहणारे श्रीराम सोपानराव डिकळे हे शासकीय कामानिमित्त घराला कुलूप लावून १ जुलै रोजी बाहेरगावी गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले.घरातील रोख रक्कम १० हजारासह सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ असा एकूण ३ लाख ८ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. २ जुलै रोजी श्रीराम डिकळे हे परतले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी डिकळे यांच्या तक्रारीवरुन भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक देवकते हे करीत आहेत.दरम्यान, इस्लापूर येथे चोरट्यांनी एका व्यापाऱ्याचे घर फोडून ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे स्टेशन रोड परिसरात राहणाºया शैलेश सुभाष लाल जयस्वाल यांच्या घराचे चॅनलगेट तोडून घरातील रोख रक्कम, टीव्ही असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.याप्रकरणी शैलेश जयस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन इस्लापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.
अशोकनगरात घरफोडी; ३ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:37 AM