क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन
देगलूर - तालुक्यातील खुतमापूर येथे आयोजित क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्पर्धेत ६० क्रिकेट संघाने सहभाग नोंदवला. प्रथम बक्षीस ३१ हजार ५५१, द्वितीय १५ हजार ५५१ दिले जाणार आहे. उद्घाटनाला विक्रम साबणे, महेश पाटील, प्राचार्य शंकर राठोड, विवेक पडकंठवार, बाबू पाटील, सचिन पाटील, नारायण पाटील, अनिल कदम आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना निवेदन
किनवट - आदिवासी मन्नेरवारलू समाज संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून दिवशीच्या घटनेचा निषेध करण्यात आला. निवेदनावर बालाजी नॅलमवार, संतोष माडपेल्लीवार, रमेश नीलमवार, निखिल गोस्कुलवार, श्रीकांत आवारीवार, प्रभाकर बोलेनवार, अलीम सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व
मुखेड - तालुक्यातील हिरानगर येथील ग्रामपंचायतवर युवा ग्रामविकास पॅनलचे सातपैकी पाच उमेदवार विजयी झाले. राजश्री राठोड, बेबी राठोड, श्रीधर राठोड, नागुबाई जाधव, मारोती जाधव अशी विजेत्यांची नावे आहेत. याबद्दल आ. राठोड यांनी सर्वांचे स्वागत केले.
डफडे पॅनल विजयी
कंधार - शेकापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ९ पैकी ६ जागा प्राचार्य किशन डफडे यांच्या पॅनलला मिळाल्या. विरोधी शिवाजी केंद्रे यांच्या पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. डफडे पॅनलचे सुमनबाई डफडे, मीना भुसकटे, सुंदरबाई कदम, मोरेश्वर मोरे, अर्चना वाघमारे, सुशीलाबाई वाघमारे निवडून आले आहेत.
पांडवे गटाचे वर्चस्व
देगलूर - तालुक्यातील रामपूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ.टी.के. पांडवे यांच्या परिवर्तन पॅनलने बाजी मारली. यात स्नेहा पांडवे, शेषेराव पांडवे, सुलोचना पांडवे बिनविरोध विजयी झाल्या. तर सुनीता इंगोले, लव्हाळी केहुरे, गंगाधर इंगोले हे विजयी झाले. सर्वांनी मतदारांचे आभार मानले.
परवाने निलंबित
नायगाव - नियमांचे पालन न करणाऱ्या नरसी, ता.नायगाव येथील तीन दुकानांचे परवाने तालुका कृषी अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहेत. मशीनचा वापर न करणे, ठळक अक्षरात भावफलक न लावणे, खत साठा रजिस्टर न ठेवणे, वजनकाटा न ठेवणे असे प्रकार उघडकीस आल्याने ही कारवाई करण्यात आली.
मोफत रोगनिदान व मार्गदर्शन
नांदेड - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी मोफत निदान व मार्गदर्शन शिबिर आयुष हॉस्पिटल शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ.राजेश पंडित यांनी दिली. या शिबिरात मूळव्याध, भगंदर, मूतखडाग्रस्त रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल. तसेच स्त्री रुग्णांची महिला डॉक्टरद्वारे व पुरुषांची पुरुष डॉक्टरद्वारे तपासणी केली जाणार असल्याचेही पंडित यांनी सांगितले.
नूतन सदस्यांचा सत्कार
नवीन नांदेड - धनेगाव, मुजामपेठ ग्रामपंचायतीच्या नूतन १५ सदस्यांचा आ.मोहन हंबर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प. सदस्य मनोहर शिंदे, तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष भागवत पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी सदस्य भूजंगराव भालके व अन्यांचा सत्कार करण्यात आला.
निधी समर्पण अभियान
कंधार - राममंदिर निधी समर्पण अभियानास कंधार येथे सुरुवात झाली. यावेळी आरएसएसचे बाबुराव गंजेवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कृष्णा बनसोडे, ॲड. गंगाप्रसाद यन्नावार, केदार महाराज, सुमीत रत्नपारखे, ॲड. अनिल डांगे, ॲड. अभय देशपांडे, ॲड. मारोती पंढरे, डॉं.रामभाऊ तायडे, भगवान व्यास, सुरेखा वडवळकर आदी उपस्थित होते.