शहरातील विठ्ठलनगर येथील एक २२ वर्षीय विवाहिता १८ मे च्या दुपारी ४ वाजता अचानक पाऊस आल्याने वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी गच्चीवर जात होती. त्यावेळी जावू योगिता ही ‘तू कपडे कशाला काढतेस, पाण्यात भिजू दे’ असे उपरोधिकपणे बोलली. यातून झालेल्या वादानंतर सदर महिलेला तिच्या पतीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता पती हणमंत किशन पांचाळ, दीर सूर्यकांत पांचाळ आणि जावू योगिता या तिघांनी विवाहितेच्या अंगावर थीनर टाकून तिला पेटवून दिले. यात सदर विवाहिता गंभीर जखमी झाली आहे. अनैतिक संबंधांस विरोध करत असल्याने विवाहितेला पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेच्या तक्रारीवरून पती, दीर,जावू, सासू राधाबाई पांचाळ, सासरा किसन पांचाळ आणि दीर नंदू पांचाळ अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवके हे करीत आहेत.
अनैतिक संबंधांस विरोध करणाऱ्या महिलेस जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:18 AM