बिलोली : येथील न्यायालयामध्ये १७ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यात दिवाणी, फौजदारीसह बँकेच्या विविध २१२८ पैकी ४४३ प्रकरणांमध्ये तडजोड करुन निपटारा करण्यात आला. यात १ कोटी ७० लाख ४८ हजार ८१ रुपये एवढी रक्कम तडजोडीत मिळाली.राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार १७ मार्च रोजी बिलोली विधि सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यात जिल्हा न्यायाधीश एस.बी.कचरे, दिवाणी न्यायाधीश एस.ए.इनामदार, दिवाणी न्यायाधीश ‘क’ स्तर पी.के.मुटकुले उपस्थित होते. यावेळी पॅनलचे सदस्य अॅड.एम.पी.कुलकर्णी, अॅड़नीळकंठ कदम, अॅड़एम.एम.बेग, अॅड़एम.के.म्हेत्रे, अॅड़ए.एल. बिलोलीकर, अॅड़ रमण देशमुख, अॅड. नागेश येरावार, पक्षकार उपस्थित होते. जलद आणि सोप्या पद्धतीने न्याय मिळावा, या संकल्पनेतून राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४४३ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आले.
किनवटमध्ये दोन जोडप्यांचा संसार पुन्हा जुळलाकिनवट येथील न्यायालयात १७ मार्च रोजी पार पडलेल्या लोक- अदालतीत ६५ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आले़ यात ५३ लक्ष २२ हजार २४१ रुपये तडजोडीची रक्कम म्हणून जमा झाली़ विशेष म्हणजे, या लोकअदलातीत विस्कटलेल्या दोन जोडप्यांचा संसार पुन्हा जुळविण्यात आला़तालुका विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये लोकअदालतीचे बोधगीत प्रदर्शित करण्यात आले़ दोन पॅनलमध्ये ही लोकअदालत पार पडली़ एका पॅनलचे प्रमुख म्हणून न्यायमूर्ती जहांगीर पठाण व मेंबर म्हणून अॅड़आऱपी़ पुरुषोत्तमवार, के़मूर्ती यांनी काम पाहिले़ दुसऱ्या पॅनलवर प्रमुख म्हणून सहदिवाणी न्यायाधीश जे़एऩजाधव तर पॅनल मेंबर म्हणून अॅड़यशवंत गजभारे, निवृत्त प्राचार्य वि़मा़शिंदे यांनी काम पाहिले़ या लोकअदालतीत बीएसएनएल, स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा किनवट, मांडवी, सारखणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आले़ यात दाखलपूर्व प्रकरणे व दाखल असलेली प्रकरणे अशी - एकूण ६५ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आले़ त्यात ५३ लाख २२ हजार २४१ रुपये जमा झाले़ यावेळी वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड़मिलिंद सरपे, सचिव अॅड़ दिलीप काळे, सरकारी वकील अशोक पोटे, अॅड़ पंकज गावंडे, अॅडक़ुरेशी, अॅड़चव्हाण, अॅड़दराडे, अॅड़दिलीप कोट्टावार, अॅड़नेम्मानीवार, अॅड़सुनैना सिडाम, अॅड़सोनू पवार, अॅड़सुभाष ताजने, अॅड़ राम सोनकांबळे, अॅड़चव्हाण, अॅड़सुनील शिरपुरे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे जी़ पी़ जोशी, बीएसएनएलचे ज्युनिअर इंजिनिअर रवि कुमार, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एम़बी़पोपलवाड, डीक़े़सर्कलवाड, आऱबी़ उलाल, अविनाश कुंभारे, सुमेथ शेंडे आदींची उपस्थिती होती़ अदालतसाठी एस़ के़ कदरे, महेंद्रकर, भंडारे, चटलेवार, कुलकर्णी, म्यानावार, नीलवर्ण, जोंधळे यांच्यासह बीएसएनएल, स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेचे कर्मचारी न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले़ यावेळी विस्कटलेल्या दोन दाम्पत्यांचा संसार लोकअदालतीत जुळविण्यात आला़ या दोन जोडप्यांचा न्यायालयाच्या वतीने व अभिवक्ता संघाच्या वतीने न्यायमूर्ती जहांगीर पठाण व सहदिवाणी न्या़जे़एऩजाधव यांच्या हस्ते अहेर देऊन सत्कार करण्यात आला़