शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

बळीराजाचे आभाळाकडे डोळे; नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: June 19, 2024 19:32 IST

जून महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला तरी अजूनही पेरणी करण्यायोग्य पावसाचा पत्ता नाही.

नांदेड : जिल्ह्यातील काही तालुक्यांत थोडा पाऊस पडल्याने आजपर्यंत पाच तालुक्यांत १२ हजार ९७० हेक्टरवर म्हणजे प्रस्तावित क्षेत्राच्या केवळ १.६९ टक्के पेरणी झाली आहे. तर जून महिन्याचे तीन आठवडे उलटले तरी अद्याप मोठा पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तब्बल ७ लाख ७४ हजार ३३६ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यात ४ लाख ५३ हजार हेक्टर सोयबीनसाठी, तर २ लाख १० हजार ५०० हेक्टरवर कापूस या पिकांची लागवड होईल. याशिवाय तूर, ज्वारी, सूर्यफूल या अन्य पिकांची पेरणी करण्यात येणार आहे. यंदा मृग नक्षत्र कोरडे गेल्याने अजूनही पेरण्या खोळंबल्या आहेत. काही भागात शेतकऱ्यांनी काळ्या पाण्यावरच कापसाची लागवड केली असून, सोयाबीन व अन्य पिकांच्या पेरण्या मात्र झालेल्या नाहीत.

जिल्ह्यात १८ जूनपर्यंत नांदेड ५० हेक्टर, अर्धापूर १० हेक्टर, देगलूर १७३४ हेक्टर, किनवट ७६३० हेक्टर, भोकर ३५३२ हेक्टर, तर उमरी तालुक्यात केवळ १४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे. किनवट तालुक्यात सर्वाधिक ९.७८ टक्के, तर त्याखालोखाल भोकर तालुक्यात ७.५७ टक्के पिकांची तर एकूण १.६९ टक्केच पेरणी झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १५६९ हेक्टरवर कापसाची लागवड केलेली असून, ४० हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली आहे, तर रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे काही तालुक्यांत सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे.

शेतक-ऱ्यांचे आभाळाकडे डोळेशेतकऱ्यांनी खत, बियाणांची जुळवाजुळव करून ठेवली असून, जमिनीची मशागतही केलेली आहे. पण, जून महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला तरी अजूनही पेरणी करण्यायोग्य पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पावसासाठी आभाळाकडे डोळे असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

पेरणीला झाला होता दीड महिना उशीरजिल्ह्यात रविवारी काही तालुक्यांत पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी पेरणीला सुरुवात केली. पण, अनेक भागात पेरणीयोग्य पाऊसच पडला नसल्याने इतर भागातील पेरण्या खोळंबल्या. गतवर्षीही उशिराने पाऊस झाल्यामुळे तब्बल एक ते दीड महिना पेरणीला उशीर झाला होता.

मागील वर्षापेक्षा ६३ मिमी अधिक पाऊसजिल्ह्यात यंदा पेरणीयोग्य पाऊस पडला नसला तरी गतवर्षीच्या तुलनेत सरासरी तब्बल ६३ मिमी अधिक पाऊस पडला आहे. यावर्षी १८ जूनपर्यंत सरासरी ७३ मिमी एवढा पाऊस झाला आहे. तर गतवर्षी केवळ सरासरी १०.८० मिमी इतकाच पाऊस झाला होता. यावर्षी पावसाची टक्केवारी अधिक असली तरी पेरणीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस