नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावरील खड्ड्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमवावा आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहेत या राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत वारंगा ते नांदेड ३२ किमी अंतरासाठी २ तास लागत आहे. प्रवाशांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ लागतो आहे.
नांदेड-अर्धापूर- वारंगा हा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी आहे दोन पदरी एक बाजूस आणि दोन पदरी दुसऱ्या बाजूस वाहने चालतात. परंतु एक बाजूस खड्डे असल्याने एक बाजूसच वाहने सुरू आहेत. खड्ड्यामुळे समोरासमोर धडक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या राष्ट्रीय महामार्गावरून मोठं मोठी वाहने चालतात जर समोरासमोर अपघात झाला तर फार मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.