गाडी संख्या ०६५१९ / ०६५२० हु.सा.नांदेड-बंगलूर-हु.सा.नांदेड उत्सव विशेष गाडी ७ डिसेंबर ते १ जानेवारी २०२१ दरम्यान बंगलोर-नांदेड-बंगलोर नांदेड सुरु आहे. या गाडीस १ जानेवारी ते १ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. परंतु, या गाडीच्या वेळेत २५ डिसेंबर २०२० पासून बदला करण्यात आला आहे. २५ डिसेंबरपासून ही गाडी नवीन वेळापत्रकानुसार धावेल. या गाडीचा यशवंतपूर येथील थांबा २५ डिसेंबरपासून रद्द करण्यात आला आहे.
२५ डिसेंबरपासून गाडी संख्या ०६५१९ बंगलूर ते हुजूर साहिब नांदेड उत्सव विशेष गाडी बंगळूर रेल्वे स्थानकावरून रात्री १०.५० वाजता सुटेल. धर्मावरम – ०३.४५, गुंटकळ -०६.०० , रायचूर -०८.०५, विकाराबाद -१.००, परळी -६.४०, परभणी -८.३० आणि नांदेड येथे १०.५० वाजता पोहोचेल. ही गाडी यशवंतपूर येथे थांबणार नाही. गाडी संख्या ०६५२० हुजूर साहिब नांदेड ते बंगलोर उत्सव विशेष गाडी २५ डिसेंबरपासून हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी ०६.३० वाजता सुटेल. पूर्णा – ०७.०५, परभणी -०७.४०, गंगाखेड-०८.१०, परळी-०९.२०, विकाराबाद- २.००, रायचूर -७.१२, गुंटकळ-९.१५, धर्मावरम -१२.३० मार्गे बंगळूर येथे सकाळी ०४.५० वाजता पोहोचेल. ही गाडी यशवंतपूर येथे थांबणार नाही.