शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

बँका भावी प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंमलबजावणीस  माहुरात अडचणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 5:25 PM

तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागात केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभासाठी गरोदर मातांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात बँक शाखेचे जाळे नसल्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले खाते उघडण्यास अडचण निर्माण होत आहे़

- नितेश बनसोडे श्रीक्षेत्र माहूर ( नांदेड ) :  तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागात केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभासाठी गरोदर मातांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात बँक शाखेचे जाळे नसल्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले  खाते उघडण्यास अडचण निर्माण होत आहे़

गरीब, आदिवासी गरोदर मातांना आर्थिक मदत व्हावी तसेच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येत आहे़  तालुक्यातील ग्रामीण भागात पुरेशा बँक अद्यापही पोहोचल्या नसल्याने केंद्राच्या या महत्त्वाकांक्षी योजनेपासून अनेकांना मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे.  माहूर येथे स्टेट बँक आॅफ इंडियाची एक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेची एक अशा दोन शाखा आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागातील वाडी-तांड्यावरील गर्भवती महिलांना बँक खाते काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते़ यामुळे गर्भवती महिलांना त्रास सहन करून योजनेचा लाभ घेण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़

तालुक्यातील खेडेगावांत बहुतेक महिला घरीच प्रसूत होतात़ त्यामुळे मातामृत्यू व नवजात शिशू दगावण्याच्या संख्येतही मोठी वाढ होण्याची शक्यता असते़ खाजगी दवाखान्यात सिझेरीयन तसेच प्रसूतीचा खर्च न परवडणारा असतो़ त्यामुळे मोलमजुरी करून आपले पोट भरणा-या या गरीब, आदिवासी महिलांना घरीच प्रसूती करण्याशिवाय पर्याय नसतो़ दुर्गम भागातील गरोदर महिलांना प्रसूतीचा खर्च, आवश्यक खाद्य पुरवण्यासाठी आर्थिक मदत म्हणून केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे़ परंतु विविध प्रकारच्या अडचणींमुळे ही योजना अद्याप दुर्गम भागातील लाभार्थिंपासून कोसोदूर असल्याचे चित्र  तालुक्यात आहे़ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून योजना राबविण्यासाठी उत्तम काम बजावण्यात येत आहे़ यात शंका नाही़ मात्र बँकेबाबत अडचणी निर्माण होत आहेत़

कागदपत्रांची जुळवाजुळवयोजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते उघडणे महत्त्वाचे आहे़ या योजनेअंतर्गत देण्यात येणारा निधी लाभार्थिच्या बँक खात्यात जमा होत असतो़  बँक खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड आदी विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लाभार्थ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. माहूर तालुक्यातील काही गावांतील लाभार्थी ही सर्व कागदपत्रे नसल्याचे त्याच्याकडून सांगण्यात येत आहे़ बँक प्रशासनही अनेकवेळा टाळाटाळ करून लाभार्थिंना पिटाळून लावत असल्याचाही आरोप होत आहे़

योजनेचे काम सुरु आहे १५ डिसेंबर २०१७ पासून योजनेला सुरुवात झाली असून ३ जानेवारी २०१८ पर्यंत ४७ लाभार्थ्यांचे प्रस्ताव आॅनलाईन पद्धतीने अपलोड करण्यात आले. योजनेचा लाभ तळागाळापर्यंत मिळावा यासाठी आशा कार्यकर्ती, आरोग्यसेविका यांचे कार्य सुरु आहे-साहेबराव भिसे, तालुका आरोग्य अधिकारी, माहूऱ

काय आहे योजना ?प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गरोदर लाभार्थी मातांना तीन टप्प्यात ५ हजार रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात येत असते़ पहिल्या टप्प्यात गरोदर मातांची तपासणी लवकरात लवकर (१५० दिवसांच्या आत) नोंदणी केल्यानंतर १ हजार रुपये सहा महिन्यानंतर परंतु किमान गरोदरपणात एक तपासणी झाल्यानंतर दोन हजार रुपये व बाळाच्या जन्माची नोंद झाल्यानंतर बाळाला १४ आठवड्यापर्यंत किमान बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आदी प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर २ हजार रुपये असे एकूण ५ हजार रुपयांचा निधी मातेच्या बँक खात्यात वितरीत करण्यात येत असतो़ दरम्यान, याव्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थिंना त्या योजनेच्या निकषानुसार अतिरिक्त लाभ देण्यात येत असतो़ या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थिंना हा लाभ थेट हस्तांतरण पद्धती म्हणजे डीबीटीमार्फत खात्यावर जमा करण्यात येत असतो.