चौकट-काही जिल्ह्यात पुन्हा केसेस वाढत आहेत. जाहीर सभा, रॅली नको, ऑनलाईन संवाद साधा, रक्तदानासारखे कार्यक्रम घ्या. इशारा देऊनही खबरदारी न घेतल्यास यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिला आहे.
कोरोना सेंटरचा आढावा सुरू
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे ज्या ठिकाणी पाचपेक्षा कमी रुग्ण आहेत. अशा ठिकाणच्या कोविड केअर सेंटर बंद करण्यात आली होती. परंतु आता अशा बंद करण्यात आलेल्या सेंटरमधील साधनसामग्री यासह इतर बाबींचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खाजगी डॉक्टरांचीही बैठक घेण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये यांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. पहिल्या वेळी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. त्यानंतर मात्र गुन्हे दाखल करुन सील करण्यात येणार आहे.
मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड
शहर व जिल्ह्यात कोरोना संपला असे समजून अनेकजण विना मास्क फिरत आहेत. अशा प्रकारे विना मास्क फिरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या संपर्कातील २० जणांचा शोध घेण्यात येणार आहे. ज्या भागात रुग्ण सापडला त्या ठिकाणी मायक्रो सिलिंग करण्यात येणार आहे.