आर्थिक अडचणीमुळे किंवा वेडसरपणामुळे डोक्याचे जंगल बनलेल्या रस्त्यावरील वेडसर निराधार, बेघर, अपंग, भ्रमिष्ट व्यक्तींना विश्वासात घेऊन त्यांची कटींग दाढी करण्याचा ‘कायापालट’ हा उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून घेण्यात येत आहे. यावेळी ठाकूर यांच्यासमवेत लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे सचिव अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा, शिवा गिराम, ॲड. बी. एच. निरणे, संदीप छापरवाल, भाजपा नवा मोंढा मंडळ सरचिटणीस कामाजी सरोदे, बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव, संजयकुमार गायकवाड यांनी सहकार्य केले. बजरंग वाघमारे यांनी सर्व बेघरांची कोरोना नियमांचे पालन करून दाढी कटींग केली. बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्या सहकार्याने अशोक राठोड, शेख सत्तार शेख इब्राहिम यांनी सर्वांना आंघोळ घातली.
बेघर नागरिकांची दाढी अन् स्वच्छ कपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:22 AM