जिल्ह्यात अकरा ठिकाणी दारू विक्रीवर छापे
नांदेड - सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, अनेक ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारू वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. अशाच अकरा ठिकाणी अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी छापे मारुन वाहन आणि दारू असा एकूण३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तामसा हद्दीतील वानवाडी फाटा ७ हजार ५०० रुपयांची दारू पकडली. नरंगल ते हिप्परगा रस्त्यावर अडीच हजार रुपये, लिंबगाव हद्दीत २२ हजार २६० रुपये, विमानतळ हद्दीत ५ हजारांची दारू आणि दुचाकी, धर्माबादेत ६ हजार ७५०, भोकर ४ हजार ९९२ रुपये आणि २४ हजार ९९२ रुपये, मालदारी गावाच्या रस्त्यावर साडेबारा हजारांची दारू आणि मॅग्झीमो कंपनीची गाडी असा एकूण १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल, बालाजी पानपट्टीसमोर भोकर अडीच हजार रुपये, मदनूर नाका येथे पाच हजार रुपये आणि लिंबगाव हद्दीत घरातील पायऱ्याच्या खाली ठेवलेली दोन हजार रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.