लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : येथे जागृत देवस्थान (पौच्चम्मा देवी)-शीतलादेवी म्हणून संबोधले जाणाऱ्या देवीच्या नवरात्र महोत्सावास १० आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असून संस्थांनच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत़शीतलादेवी मातेचा मोठ्या संख्येने भक्तवर्ग असून आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतून भक्तमंडळी येत असल्याने मंदिरात अलोट गर्दी होत आहे. नवरात्र निमित्ताने मंदिर परिसरात देवैज्ञ सोनार समाज संघटनेच्या वतीने परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला़ संस्थांनच्या वतीने मंदिरात साफस्वच्छता करण्यात आली असून रंगरंगोटी व रोषणाईने झगमग करण्यात आली आहे.शीतलामाता देवी मंदिराचा इतिहास हा पुरातन असून देवीचे उगमस्थान मंदिराच्या शेजारील जुनी बारव विहिरीतून झाल्याची आख्यायिका आहे. मंदिर परिसरात अंदाजे पाचशे वर्षे जुना असलेले वटवृक्षाच्या पारंब्याखाली देवीचे वास्तव्य आहे. देवीस पोचम्मा या नावानेही संबोधले जाते. नऊ दिवस चालणाºया नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रम येथे भक्तिमय वातावरणात चालतात.नवरात्रात पहिल्या दीवशी देवीची घटस्थापना केली जाते. देवी पूजा कुंकवाचे मळवट भरुन अंलकार परिधान करण्यात येतात. देवीस हळद-कुंकू, नारळ, हिरवा शालू वस्त्रात ओटी भरण्यात येते़ येथे नित्यनेमाने सकाळी गजर आरती, दुपारी मध्यान आरती व मातेस पोळीचा नैवेद्य दाखवला जातो़ सायंकाळी शेजारती, तीनवेळा नगारा वाद्यांच्या गजरात आरती नित्यनेमाने करण्यात येते. यावेळी देवीचा सभामंडप केळीखांब ऊस, आंब्याच्या पानांनी हिरवागार सजावट केली जाते़ पूर्ण मंदिरात फुलांची सजावट केली जाते.विशेष म्हणजे, या ठिकाणी देवीदर्शनासाठी सर्वधर्मीय भक्त येतात़ नवसाला कौल देणारी देवी आहे, असे भक्त सांगतात़ नवस फेडण्यासाठी भक्त येतात़ नवरात्रात नऊ दिवस, पाच दिवस येथे देवीजवळ धरणे धरुन नवसाची परतफेड मोठ्या श्रद्धेने करताना दिसतात. अष्टमीच्या दिवशी येथे महाप्रसाद, तांबोळ प्रसादाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती विश्वस्त विजय कुलकर्णी यांनी दिली आहे.तीर्थक्षेत्रासाठी गावकºयांकडून पाठपुरावा केला होता़ त्यानंतर माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून बारडला तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला़ त्यातून या ठिकाणच्या मंदिर परिसराचा कायापालट झाला असून रस्त्यांसह अनेक कामे मार्गी लागली़ याठिकाणी बाहेरराज्यांतून भक्ताची संख्या मोठ्या प्रमाणात असते़ तसेच दिवसेंदिवस भक्ताची श्रद्धा वाढल्याने देवी दर्शनासाठी गर्दी वाढतच आहे. त्यासाठी भक्तनिवासाची सोय होणे गरजेचे आहे.
शीतलादेवी नवरात्र महोत्सवात सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 1:24 AM