शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, ठोकलं द्विशतक; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र
2
Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!
3
Wayanad By Election Result 2024: प्रियांका गांधींची विजयाच्या दिशेने कूच! पहा आकडेवारी
4
Jamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपाचे 'संकटमोचक' आघाडीवर; गिरीश महाजन सातव्यांदा विजयी होणार?
5
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर
7
Maharashtra Assembly Election 2024 Result : आशिष शेलारांच्या भावाकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांना टफ फाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर
10
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुती-महाविकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’; भाजपाला सर्वाधिक आघाडी, मनसेची स्थिती काय?
12
Jogeshwari Vidhan Sabha Election Results 2024 : जोगेश्वरीत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आघाडीवर, सुरुवातीच्या कलात महायुतीची जोरदार मुसंडी
13
Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अजित पवारांची घरवापसी? उद्धव ठाकरे भाजपासोबत? महाराष्ट्रात सरकार स्थापनेची ५ समीकरणे
15
कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत खल्लास! टीम इंडियाला मिळाली अल्प आघाडी
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights :भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं
18
शेअर बाजारात ५ महिन्यांचा उच्चांक; गुंतवणूकदारांनी ७.१५ लाख कोटी कमावले
19
अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर
20
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!

परराज्यांतून येणाऱ्या मिठाईपासून सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 7:52 PM

गतवर्षी सापडली होती भेसळयुक्त बर्फी

ठळक मुद्देग्राहकांनो सावधान गणेश मंडळानी विशेष खबरदारी घ्यावी

नांदेड : सण-उत्सव काळात मिठाईची वाढती मागणी लक्षात घेवून काही दुकानदार, व्यावसायिकांकडून भेसळयुक्त मिठाई विकण्याचा प्रयत्न केला जावू शकतो़ गतवर्षी गणपती-गौरी सणाच्या काळात जवळपास १ क्विंटल भेसळयुक्त बर्फी जप्त केली होती़ यंदा अन्न व औषध प्रशासन विभागाने मिठाईचे जवळपास ३८ नमुने तपासणीसाठी घेतले आहेत़  

नांदेड जिल्ह्यात दुधाचे उत्पादन गरजेप्रमाणे आहे़ त्यामुळे मिठाई व तत्सम पदार्थांसाठी लागणारे दूध, खव्वा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो़ परिणामी भेसळ होण्याला फारसा वाव मिळत नाही़ आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या तपासणीमध्ये कुठेही भेसळयुक्त मिठाई आढळून आली नाही़ स्थानिक मिठाई उत्पादक, विक्रेते यांच्याकडून भेसळ केली जात नसली तरी गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांतून येणाऱ्या स्पेशल मिठाईमध्ये भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही़  गतवर्षी अन्न व औषध प्रशासन विभागाने गणपती- गौरी उत्सवाच्या काळात राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान गुजरातची स्पेशल बर्फी पकडण्यात आली होती़ या मिठाईमध्ये भेसळ असल्याचे आणि मानवी शरीरासाठी घातक असणारे केमिकल वापरले गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर जवळपास १ क्विंटल बर्फी नष्ट करण्यात आली होती़ त्यामुळे सण-उत्सव काळात वाढती मागणी लक्षात घेवून बाहेरची बर्फी, पेढा व इतर गोड पदार्थ व्यापारी आयात करू शकतात़ बाहेरून येणाऱ्या मिठाई, गोड खाद्यपदार्थासंदर्भात काळजी घ्यावी़ यामध्ये शिंगाडा पीठ, ताज, मैदामिश्रित मिठाई आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तसेच त्यात वापरले जाणारे रंग शरीरासाठी घातक असतात़ सदर पदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे़ 

गणेश मंडळानी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले  आहे़ त्यासाठी प्रसाद उत्पादनाची जागा स्वच्छ असावी, प्रसादाला लागणारी भांडी स्वच्छ आरोग्यदायी व झाकण असलेली असावी, आवश्यक तेवढ्याच प्रसादाची निर्मिती करावी,  प्रसाद बनविताना लागणारे पाणी पिण्यास योग्य असावे, कच्च्या मालाचा घटकपदार्थ परवानाधारक अन्न व्यावसायिकांकडूनच खरेदी करावेत व त्यांचे खरेदी बिल जतन करुन ठेवावेत. मिठाई, पेढे आदी प्रसादाचे पदार्थ झाकून ठेवावेत व जंतूसंसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे़ 

श्री गणेश मंडळांनी विशेष खबरदारी घ्यावीश्री गणेश उत्सवानिमित्ताने विविध गणेश मंडळाकडून प्रसाद तयार करुन भाविकांना वाटप करण्यात येतो. त्यामुळे गणेश मंडळांनी अन्नसुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत त्याची नोंदणी करावी़ सर्व सार्वजनिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरण करणारे अन्न व्यावसायिक यांनी अन्नसुरक्षा मानके अधिनियम २००६ व त्याअंतर्गत नियम व नियमन २०११ मधील तरतुदीचे सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने पालन करणे बंधनकारक आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जात असून आजपर्यंत संशयित ठिकाणच्या जवळपास ३८ मिठाई नमुन्यांची तपासणी केली आहे़               - टी़ सी. बोराळकर, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासऩ

टॅग्स :NandedनांदेडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागCrime Newsगुन्हेगारी