नांदेड : भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात २२ जूनपासून तीन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मान्सूनचा पाऊस लवकर दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने सकाळच्या सत्रात जाहीर केला होता. दरम्यान, मुंबईतील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राकडून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २२, २३ आणि २४ असा तीन दिवसांचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या तिन्ही दिवशी जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.